उत्तम पाटील : बोरगावमधील योळमक्कळ ताई मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना
निपाणी (वार्ता) : ताणतणावाच्या युगात सध्या अध्यात्म ही काळाची गरज बनली आहे. यासाठी प्रत्येक खेडोपाड्यात अध्यात्मिकतेला विशेष असे महत्त्व दिले जात आहे. मठ मंदिरावरूनच गावाची खरी ओळख होत आहे. अशा मंदिरांची, देव देवतांचे पवित्रता राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
बोरगाव येथील कोरवी समाजाचे आराध्य दैवत येळमक्कळ ताई या मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख करण्यात आला. उपस्थितीत आज आपण ज्या समाजात जन्म देतो त्या समाजाचे ऋण फेडण्याचे हे सर्वांचे कर्तव्य आहे. यासाठी युवकांनी प्रयत्न करावे. आज समाजात अनेक अडचणी असतात. सर्वांनी एकसंघ होऊन या अडचणी मिटवाव्यात. युवकांनी शिक्षणाकडे वळून समाज सुधारण्यासाठी प्रयत्न करावे. अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण बोरगावसह परिसरातील अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला आहे. त्यात सहकार नेते रावसाहेब पाटील व उद्योजक अभिनंदन पाटील यांचे मोलाचा वाटा आहे. कोरवी समाज अनेकवर्षापासून पाटील कुटुंबियांशी प्रमाणिक आहे. त्या समाजाला व समाजाच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत. हे मंदिर आराध्य दैवत आहे. या ठिकाणी धार्मिकता व स्वच्छता राखण्याची जबाबदारी समाजातील युवकांची आहे. मंदिराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून मंदिरासमोर पेवर ब्लॉक बसविण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करू अशी ग्वाही यावेळी उत्तम पाटील यांनी दिली.
समाजाचे प्रमुख फौजी शशिकांत कोरवी यांनी, युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रयत्नानेच या ठिकाणी मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठा करावी अशी फार दिवसापासून मागणी होती. या मागणीची दखल घेत अरिहंत उद्योग समूहाकडून मूर्ती प्रतिष्ठानसाठी सहकार्य करण्यात आले आहे. त्यांच्यामुळेच या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना झाली आहे.
बाबासाहेब कोरवी दाम्पत्यांनी दाम्पत्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. कार्यक्रमास नगरसेवक अभयकुमार मगदूम, रोहित पाटील, दिगंबर कांबळे, अमर शिंगे, बाळासाहेब अपराज, बबन रेंदाले, सिकंदर अफराज, बाळासाहेब सातपुते, अशोक कोरवी, आनंद कोरवी, सुरेश कोरवी, श्रीकांत कोरवी, संजय कोरवी, पांडुरंग कोरवी, पुंडलिक कोरवी, शशिकांत कोरवी आर्मी, अनिल कोरवी, कार्तिक कोरवी, अमोल कोरवी, अजित कांबळे, राजू पाटील, यांच्यासह कोरवी समाजाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta