Wednesday , March 4 2026
Breaking News

कोगनोळी येथे वळीव पावसाची दमदार हजेरी

Spread the love

लोकांची तारांबळ : आठवडी बाजारात शेतकऱ्यांचे नुकसान
कोगनोळी : परिसरात वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. जोरदार वारा, विजेचा कडकडाट, जोरदार पाऊसाचा मारा यामुळे या विभागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
सुमारे दोन तास झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने हुलकावणी दिली होती. शुक्रवार तारीख 30 रोजी दिवसभर कडक ऊन जाणवत होते.
दुपारी चारच्या सुमारास अचानक ढग जमून येऊन विजेच्या कडकडाटासह, जोरदार वाऱ्यात वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. झालेल्या दमदार पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी गेले. तर गावातील मुख्य रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी होऊ लागले होते.
कोगनोळी येथील शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने आसपासच्या खेड्यातील शेकडो शेतकरी आपल्या शेतातील पालेभाज्या घेऊन बाजारासाठी आले होते. पण सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले. दमदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते तर गटारी तुडुंब भरून वाहू लागल्या होत्या. येथील मुख्य बाजारपेठेत या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने अनेक व्यापाऱ्यांचे फळभाज्या या पावसात वाहून जाऊ लागल्या होत्या.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारून नवी दिशा द्यावी; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक

Spread the love  पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *