गांधी जयंतीचे औचित्य : घंटागाडीला कचरा देण्याचे आवाहन
निपाणी (वार्ता) : महात्मा गांधीजींनी ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविले होते. त्या पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त येथील नगरपालिका पदाधिकाऱ्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी (ता.२) सकाळी महात्मा गांधी चौक परिसर, गुजरी पेठ व इतर भागात स्वच्छता मोहीम राबवली. त्यामुळे परिसर चकाचक झाला. त्यांच्या या उपक्रमाचे शहरातून कौतुक होत आहे.
नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी, निपाणी नगरपालिकेतर्फे स्वच्छ सुंदर शहरासाठी घरातील कचरा संकलनासाठी घंटागाड्याचा उपक्रम रागवला तरीही अनेक व्यवसायिक, हॉटेल चालक व नागरिक घंटागाडीला कचरा न देता थेट रस्त्यावर टाकत आहेत. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी ही आता घंटागाडीला ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने दिल्यास शहरात स्वच्छता नांदणार आहे. शिवाय आरोग्याच्या बाबतीतला प्रश्न मिटणार आहे. नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी दिवस रात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. तरीही नागरिकांनी या कर्मचाऱ्यांना सहकार्य करूनआपल्या घराच्या परिसरासह गल्लीत स्वच्छता राहील याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
या मोहिमेत कार्यक्रमास नगराध्यक्ष जयवंत भाटले, पिंटू बागडे, सभापती राजू गुंदेशा, नगरसेवक संतोष सांगावकर, दत्ता जोत्रे, माजी नगरसेवेक विजय टवळे, रवी कदम, अभिजीत मुदकुडे, रवींद्र इंगवले, राजेश कोठडीया,आकाश शेट्टी, प्रणव मानवी, रवी कदम, सुभाष कदम, प्रशांत रामनकट्टी, महादेव बरगाले, अमित रणदिवे, माजी सभापती दीपक माने, पर्यावरण अभियंते विवेक जोशी, बी. बी. सातवार, बंडा घोरपडे यांच्यासह नगरसेवक, पालिकेतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta