Thursday , December 11 2025
Breaking News

निपाणी शहर, परिसरात सीमोल्लंघन

Spread the love
सोने लुटून दसरा साजरा : दसऱ्याच्या एकमेकांना शुभेच्छा
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात बुधवारी (ता.५) दसरा सण उत्साहात साजरा अनेक ठिकाणी सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नागरिकांनी एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाडामध्ये विविध उपक्रमांनी नवरात्र उत्सव आणि दसरा सण उत्साहात पार पडल. निपाणकर घराण्याच्या परंपरेप्रमाणे राजघराण्यातील मानाच्या पालख्या सायंकाळी निपाणकर राजवाड्यामधून वाजत गाजत आमराईमधील रेणुका मंदिरामध्ये दाखल झाल्या. यानंतर निपाणकर घराण्याचे विद्यमान राजेसाहेब श्रीमंत दादाराजे निपाणकर, युवराज सिद्धोजीराजे निपाणकर, श्रीमंत धनदीपराजे निपाणकर आपल्या लवाजमासह निपाणीच्या वेशीवर उभा केलेले आपट्याच्या झाडाजवळ गुरुप्रसाद शेंदुरकर यांच्या पौरोहित्याखाली पूजा करण्यात आली. त्यानंतर श्रीमंत दादाराजे यांच्या उपस्थितीत रेणुका मंदिरा समोर सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सर्व लवाजमा पालख्या व राजेंच्या गाड्यांचा ताफा निपाणकर राजवाड्याकडे गेला. राजवाड्यामध्ये श्रीमंत निपाणकर यांचा सवासिनीने ओवाळून स्वागत केले. परंपरेनुसार बंदुकीचे बार काढून नगाराच्या आवाजात राजवाड्यामध्ये श्रीमंत दादाराजे निपाणकर यांचा प्रवेश झाला. अंबाबाई चौकामध्ये बळीराजाच्या पोटातून सोन्याची अंगठी काढून आई तुळजाभवानीच्या चरणी अर्पण केली. त्यानंतर आरती करून दरबारमध्ये श्रीमंत निपाणकर यांनी प्रवेश केला. गादीला नमन करून त्याच्यावर आरूढ झाले. यानंतर युवराज सिद्धोजीराजे, श्रीमंत लक्ष्मणराजे, श्रीमंत शरदराजे, श्रीमंत विजयराजे, श्रीमंत राजेशराजे, श्रीमंत आप्पासाहेबराजे, श्रीमंत धनदीपराजे, श्रीमंत शिवमराजे, श्रीमंत शिवतेजराजे निपाणकर व श्रीमंत राजमाता राजलक्ष्मी, राजे निपाणकर यांनी सोने देऊन शाही दरबारास प्रारंभ झाला. गावातील शेकडो लोकांनी या दरबारामध्ये येऊन सोने देण्याघेण्याचा कार्यक्रम केला. सायंकाळी आरती करून दसरा सणाचे समाप्ती झाली. कार्यक्रमास अंमलझरीतील मानाचे खोत मंडळी, शेंडूरचे मानाचे पाटील, यरनाळचे मानाचे निंबाळकर, निपाणीतील चंद्रकांत तारळे, हेमंत सासणे, ममदापूरचे श्रीकांत पुजारी, प्रमोद पुजारी, प्रसाद पुजारी, युवराज पाटील, कोडणीचे किरण माने, अमित गिजवणे, सुजितसिंह गायकवाड, पांडुरंग भोई, गजानन भोई, शिवाजी भोई, प्रकाश मोहिते, कणगल्याचे मानाचे कमते मंडळी, आप्पाचीवाडी व कुर्लीचे मानकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

भोवी-वडर समाजाच्या विकासासाठी बेळगावात आज नेते मंडळींचे मार्गदर्शन

Spread the love  निपाणी (वार्ता) : भोवी-वडर समाज विकास निगममधून समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *