Tuesday , March 3 2026
Breaking News

‘रयत’चा गुणवतेला प्राधान्य क्रम : आमदार निलेश लंके

Spread the love

 

सिद्धेश्वर विद्यालयास सदिच्छा भेट

निपाणी (वार्ता) : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात तळागाळातील लोकांसाठी शिक्षणाची व्दारे खुली करून दिली. सध्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शैक्षणिक उपक्रम यशस्वी राबविण्यात येत आहेत. स्पर्धेच्या युगात रयत शिक्षण संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाला अधिक प्राधान्य दिले असल्याचे मत पारनेर (ता.अहमदनगर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली येथे सदिच्छा भेटी प्रसंगी व्यक्त केले.
स्कूल कमिटी सदस्य ॲड. संजय शिंत्रे यांनी स्वागत केले. मुख्यध्यापक बी. एस. पाटील यांनी विद्यालयाची स्मरणिका भेट दिली. संस्थेचे आजीव सदस्य एस. एस. चौगुले यांनी विद्यालयातील उपक्रमांची माहिती दिली. विद्यालयाची गुणवत्ता व भौतिक विकास याबद्दल निलेश लंके यांनी समाधान व्यक्त करताना कुर्लीतील सदाशिव परशुराम निकाडॆ व बंधूनी शाळेसाठी जमीन दान दिली हे ऐतिहासिक अविस्मरणीय कार्य असल्याचे सांगितले. याबद्दल जमीन देणगीदार निकाडे परिवाराचे प्रतिनिधी म्हणून स्कूल कमिटी सदस्य अरुण निकाडे यांचा निलेश लंके यांनी विशेष सत्कार केला.
याप्रसंगी तानाजी पाटील, अरुण निकाडे, संजय वैराट, के. डी. पाटील, हलसिद्धनाथ कारखाना संचालक आर एम खोत, अमरबापू शिंत्रे, लक्ष्मीकांत पाटील- भिवशी, विश्वास आबणे, विजय शिंत्रे, टी. के. जगदेव, अजित पाटील, नानासाहेब पाटील, कुमार खोत, आदेश आबणे, धनाजी पोटले, सर्जेराव खोत, गणेश माळी, रोहन पाटील, विजय साळुंखे यांच्यासह आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

नगरपालिकेवरील जीर्ण भगवा ध्वज बदलण्याच्या निर्णया प्रकरणी स्वराज्य रक्षक संघटनेच्या नवनाथ चव्हाण यांना अटक, सुटका

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील स्वराज्य रक्षक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ नामदेव चव्हाण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *