व्यवस्थापकांच्यावतीने विद्यार्थ्यांचा सत्कार :२५ विद्यार्थ्यांचे यश
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची जिल्हा व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. एकूण २५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून चेअरमन उत्तम पाटील व संचालिका मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते सदर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
उत्तम पाटील म्हणाले, सीमाभागासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी सहकार नेते रावसाहेब पाटील यांनी बोरगाव येथे अरिहंत मराठी शाळेची स्थापना केली. या शाळेत शालेयज्ञानाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्राचेही ज्ञान देण्यात येते. प्रत्येक वर्षी अरिहंत शाळेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होत असते. क्रीडा स्पर्धेपासूनच विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते, हे ओळखून आपण प्रत्येकवर्षी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतो. शाळेच्यावतीनेही विद्यार्थ्यांना संपूर्ण सहकार्य करून आपल्या शाळेचा विद्यार्थी तालुका पातळीबरोबरच जिल्हा व राज्य पातळीवरही चमकावा व शाळेचे नाव उज्ज्वल व्हावे, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
संचालिका मीनाक्षी पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना क्रीडा वदेहीक ज्ञान मिळावे यासाठी आपल्या शाळेतील प्रत्येक शिक्षक धडपडत असतो. विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होण्यामागे क्रीडा शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचा मोलाचा वाटा आहे. यापुढेही विद्यार्थ्यांना असेच यश मिळो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
याप्रसंगी संस्थापक चेअरमन रावसाहेब पाटील, कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, विनयश्री पाटील, धनश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, व्हा. चेअरमन अमय करोले, अण्णासाहेब भोजकर, व्यवस्थापक बी. ए. हावले, मुख्याध्यापक एस. ए. पाटील, दयानंद सदलगे, क्रीडा शिक्षक पी. ए. परीट, आर. जी. पाटील यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta