हंचिनाळ : येथील सहकार क्षेत्रात सर्वात अग्रगण्य असलेल्या श्री ब्रह्मनाथ मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि. हंचिनाळ. या संस्थेमार्फत सन 2021 22 सालाकरिता शेकडा नऊ रुपये याप्रमाणे आर्थिक वर्षात 261238 लिटर दूध संकलन करून विक्रमी दहा लाख 75 हजार 318 रुपये 20 पैसे इतका बोनस संस्थेमार्फत वाटप करून गावाच्या इतिहासात विक्रम प्रस्थापित केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विजय कुरणे हे होते.
यावेळी प्रारंभी संस्थेचे सचिव दत्तात्रय पोवार यांनी स्वागत तर संस्थेचे माजी चेअरमन अनिल कुरणे प्रास्ताविक केले. त्यानंतर म्हैस दूध उत्पादनात अनुक्रमे प्रथम क्रमांक मंगल चौगुले यांनी 82508 रुपये बोनस तर रामा वडर यांनी 49918 रुपये, तर आदगोंडा कुरणे 31761 रुपये. त्यानंतर उत्तेजनार्थ सुनील बस्तवडे 23062 रुपये. आप्पासो पाटील यांनी 18565. तर. गाय दूध उत्पादनामध्ये अनुक्रमे बाळासाहेब भिवसे, आनंदा बळवंत चौगुले, मंगल चौगुले, डॉक्टर अजित पाटील, शाहीर आनंदा गायकवाड इत्यादी सर्व विजेत्यांना बोनस रक्कम, वीस ग्रॅम चांदीचे नाणे, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी गावचे सुपुत्र श्री. बाळासाहेब मारुती पाटील यांना आंतरराज्य मुख्याध्यापक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व दूध उत्पादकांना दिवाळीसाठी वापरात येणाऱ्या वस्तूंचा आकर्षक संच भेट वस्तू म्हणून वितरित करण्यात आला.
या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती म्हणून माजी चेअरमन अनिल कोंडेकर, रमेश पाटील, संस्थेचे चेअरमन विजय करणे, व्हाईस चेअरमन नवनाथ चौगुले, संचालक दीपक पाटील, आनंदा चौगुले (बिडी), आप्पासो पाटील, संजय कोंडेकर, राहुल पंचम, संदीप कुंभार, प्रकाश ढाले, सौ. मंगल मजगे, आशाबाई नलवडे, धोंडीराम मजगे, संभाजी कोंडेकर, बाळासो कोंडेकर, आनंदा यशवंत नलवडे, महादेव पोवार चौगुले, अरविंद वडर, अरुण डोंगरे, एकनाथ पाटील, दत्ता पाटील, सागर गायकवाड यांच्यासह दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta