मानकरी उरुस कमिटी सदस्यांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : श्री संत बाबा महाराज चव्हाण दर्गा प्रस्थापित श्री महान अवलिया हजरत पीरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरसाला सोमवारी (ता. २४) धार्मिक विधीने प्रारंभ झाला. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे या उत्सवाला मर्यादा आल्या होत्या मात्र यंदा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. त्यानुसार उरूस उत्सव कमिटी व मानकरी यांच्या उपस्थित धार्मिक विधींना सुरुवात झाली.दर्ग्याला अभ्यंगस्नान व अभिषेक घालण्यात आला.
श्री.संत बाबा महाराज चव्हाण दर्गा प्रस्तापित श्री महान अवलिया हजरत पीरानेपीर दस्तगीर साहेब (क. स्व) यांचा प्रतिवर्षाप्रमाणे चव्हाण वारसातर्फे मानकऱ्याचा बरोबर लावाजम्यासह दीपावली अभिषेक सोहळा (अभ्यंग स्नान) चव्हाण वाडा येथून दर्गा देवस्थान येथे तुरबतीस चव्हाण वारसातर्फे प्रथम अभ्यंग स्नान व अभिषेक घातला जाते. या विधीने खऱ्या अर्थाने उरुसाला सुरुवात होते.सकाळी श्री. संत बाबा महाराज चव्हाण समाधी स्थळाकडे जाऊन अभिषेक घालण्यात आला. तेथून चव्हाणवाडा (मुळगादि) या ठिकाणी अभिषेक घालण्यात आला. यावेळी दर्ग्याचे पुजारी इम्तियाज मुजावर यांचा बाळासाहेब देसाई सरकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी चव्हाण वारस व उरूस उत्सव कमिटी अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, पृथ्वीराज चव्हाण- सरकार, संग्राम देसाई सरकार, रणजीत देसाई सरकार, विवेक मोकाशी, राजू निपाणकर, दादासाहेब कांबळे, सनी साळुंके, प्रदीप हेगडे, मारुती कमते, शिरीष कमते, विवेक मोकाशी, संजय माने, जयराम मिरजकर, प्रभाकर पाटील, शरदचंद्र माळगे, शामराव कांबळे, बाळासो पोतदार, प्रकाश मोहिते, गौरंग तिळवे, संभाजी मुगळे, विश्वास माळी, विवेक माने, अजित देवर्षी, अजित भोकरे,प्रवीण पोतदार, सचिन पावले, सुजित गायकवाड, दत्तात्रय किणेकर, बंडोपंत गंथडे, महादेव लाड, प्रकाश मोहिते, सतीश काजवे, शितल गंथडे, यांच्यासह साळी समाज व भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta