पाच टन कचरा संकलन : नगरपालिका कर्मचाऱ्यांचे योगदान
निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात सलग पाच दिवसदिवाळीची धामधूम सुरू होती. त्यानिमित्ताने विविध प्रकारची खरेदी, लक्ष्मीचे पूजनसह विविध कार्यक्रम पार पडले. या काळात शहरात फटाक्याचे कागद व विविध प्रकारच्या पूजेचे साहित्य असा मोठा कचरा संकलित ही बाब लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाने दिवाळी काळातही आरोग्य विभागातर्फे स्वच्छता कर्मचाऱ्याकडून निरंतरपणे स्वच्छतेची मोहीम राबवली. त्यामुळे यंदा दिवाळी काळात पाच टन कचरा रस्त्याकडेला नसता संकलित करून तो पट्टणकुडी येथील कचरा प्रकल्पाला पाठवण्यात आला. कांबळे पालिका पदाधिकारी आरोग्य विभाग आणि सफाई कामगारांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरवर्षी दिवाळीनंतर व्यवसायिक व नागरिकांच्या घरातील कचरा आठवडाभर रस्त्यावर साठून राहत होता. त्यामुळे शहरात कचऱ्याचे घेर दिसून येत होते. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात घेऊन नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने यंदाच्या दिवाळीतील तब्बल पाच टन कचऱ्याची उचल केली आहे. याशिवाय सर्वच प्रभागात कचरा गाडीच्या फेऱ्याही वाढविले आहेत.
दिवाळी हा वर्षातील मोठा सण असूनही नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी सुटी घेतलेली नाही. निरंतर स्वच्छ मोहीम राबवून शहरातील नागरिकांचे आरोग्य जोपासले आहे.
दिवाळी प्रारंभ होण्यापूर्वी कार्यालये आणि व्यवसायाच्या ठिकाणांची स्वच्छता केली गेली. त्यामुळे कचरा आणि खराब प्लास्टिक कागदाचा कचरा संकलित झाला. दररोज पहाटे ५ते दुपारी १२ आणि सायंकाळी चार ते सहा या वेळेत शहरातील कचरा संकलित के आहे. यंदा फटाके उडवण्यावर निबंध असले तरी निपाणीकरांनी मोठया प्रमाणात खरेदीवरून फटके फोडले. त्यामुळे त्याचा कचराही निर्माण झाला होता. लक्ष्मीपूजनासाठी उस, फुले व केळीची झाडे रस्त्यावर टाकले होते. त्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने दररोजचा कचरा उठाव करण्याचा प्रयत्न आहे.
—-
‘नागरिक लक्ष्मीपूजनासाठी वापरलेली फुले व अन्य साहित्य नदी, विहिरी आणि तलावात टाकतात. त्यामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सर्व कचरा घंटागाडीला देण्याचे आवाहन केले होते. त्याला या वर्षी नागरिकाकडून चांगला प्रतिसाद मिळला.’
-विवेक जोशी, अभियंते निपाणी नगरपालिका
Belgaum Varta Belgaum Varta