Wednesday , December 10 2025
Breaking News

महापुरुषांचे विचार समाजात रुजले पाहिजेत

Spread the love

 

माजी आमदार काकासाहेब पाटील: निपाणीत कार्यकर्त्यांचा मेळावा

निपाणी (वार्ता) : देशात पुरोगामी चळवळ निरंतरपणे सुरू आहे. तत्कालीन समाज व्यवस्थेवर असूड ओढणारे समाजसुधारकांना भाजप सरकार बाजूला करत आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, गौतम बुद्ध, यासारख्या महापुरुषांनी देशात पुरोगामी चळवळ बळकट करताना त्यावेळच्या प्रस्थापित व्यवस्थे विरुद्ध काम केले. अशा महापुरुषांचे योगदान नामशेष करण्याचा प्रयत्न राज्य आणि केंद्रातील सरकारकडून होत आहे. त्यासाठी कर्नाटक राज्य प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जरकीहोळी यांनी जनजागृतीचे कार्य हाती घेतले. या उपक्रमाची सुरुवात निपाणीत रविवारी (ता.६) निपाणी येथून होणार आहे. या कार्यक्रमास कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केले. येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात मानव बंधुत्व वेदिकेतर्फे ‘घरोघरी महापुरुषांच्या विचारांचा जागर’ कार्यक्रमात ते बोलत होते.
घरोघरी जनजागृती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील प्रमुख काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. प्रारंभी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. रविवारी (ता.६) दुपारी ४ वाजता म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमास म्हैसूर येथील ज्ञानप्रकाश स्वामीजी, महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे, हेब्बाळ येथील बसवचेतन स्वामी व चैतन्य महाराज हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी, महापुरुषांचे विचार, ध्येयधोरणे ही मातीमोल करण्याचा प्रयत्न भाजपा सरकार कडून सुरू आहे. त्या विरोधात सतीश जारकीहोळी यांनी कार्यकर्त्यांसह संपूर्ण राज्यात जनजागृती करणार असल्याचे सांगितले.
बैठकीस माजी मंत्री वीरकुमार पाटील, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर, युवा नेते रोहन साळवे, बेडकीहाळ भाग काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, महावीर मोहिते, अण्णासाहेब हवले, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, राजेंद्र चव्हाण, निकु पाटील, संभाजी गायकवाड, नवनाथ चव्हाण, श्रीनिवास संकपाळ, प्रशांत नाईक, अरुण आवळेकर, अशोक लाखे, कबीर वराळे, युवराज पोळ, सुधाकर सोनकर, अस्लम शिकलगार, बाबुराव खोत, अमोल बन्ने, शशिकांत पाटील सुभाष जाधव यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

Spread the love  चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *