उत्तम पाटील यांनी केली सुपूर्द : मुनी महाराजांचे घेतले दर्शन
निपाणी (वार्ता) : डोणगाव (जि.बुलढाणा) येथे संतशिरोमणी, आचार्य श्री १०८ विद्यासागर जी मुनी महाराज यांची कर्नाटक जैन असोसिएशनचे संचालक, युवा नेते उत्तम पाटील यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज यांनी उत्तम पाटील यांना आशीर्वाद दिले.
डोणगाव येथे श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर जीर्णोद्धारासाठी श्रावक रत्न रावसाहेब पाटील (दादा) कुटुंबीयांकडून यावेळी एक लाखाची देणगी युवा नेते उत्तम पाटील यांनी मंदिर पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
श्रावकर रत्न रावसाहेब पाटील कुटुंबीय नेहमीच सर्वच समाजाच्या विकासासाठी सहकार्य करीत आहे. मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी भरीव निधी देत रावसाहेब पाटील दादा यांनी समाजाचा विकास साधला आहे. डोणगाव येथे जैन मंदिरासाठी त्यांनी दिलेली देणगी ही लाख मोलाची असल्याचे मंदिर पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यावेळी उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अभयकुमार करोले, राजू मगदूम, मनोजकुमार पाटील, निरंजन पाटील -सरकार, बाळासाहेब सातपुते, राजेंद्र पाटील, प्रदीप माळी, राजेंद्र ऐदमाळे, सुमित रोड्ड, सुरेश बंकापुरे, दर्शन पाटील, प्रवीण पाटील, तैमूर मुजावर, रावसाहेब चौगुले, चंदू पाटील, यांच्यासह अरिहंत परिवाराचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta