१५० हून अधिक जनावरांना लंपीची लागण: पशुपालकांच्यात भीतीचे वातावरण
निपाणी (वार्ता) : कोरोना, महापूर, नैसर्गिक संकटानंतर शेतकऱ्यांना पुन्हा आता लंपी संकटाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. बोरगाव व परिसरातील शेकडो जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. हा रोग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोरगाव पशुवैद्यकीय केंद्राच्या व्याप्तीत आजपर्यंत सुमारे अठराहून अधिक जनावरे या लंपी रोगामुळे मृत पावले आहेत. तर दीडशेहून अधिक जनावरांना या रोगाची लागण झाली आहे.
आरोग्य केंद्राच्या व्याप्तीत बोरगाव, कसनाळ, मानकापूर, शिरदवाड व बोरगाववाडी असे पाच गावे आहेत. या गावांमध्ये जनावरांची संख्या सर्वाधिक आहे. असे असले तरी या पाच गावांना एकच पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. सध्या लंपि रोगाची फैलाव मोठ्या प्रमाणे होत आहे. त्यामुळे हा रोग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासकीय मोठ्या प्रमाणात राबत आहे. पण डॉक्टर एकच असल्यामुळे समस्या होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पण लक्ष देत नसल्याने पशुपालकांमध्ये मोठी चिंता होत आहे.
लंपी रोग लागण झाल्याने रोग बरा करण्यासाठी सर्वसामान शेतकऱ्यांना सुमारे वीस हजारह अधिक खर्च येत आहे. लसीकरण ही करण्यात येत आहे. तरीही मोठ्या प्रमाणात जनावरे मृत पावत आहेत. जनावरे मृत पावल्यास त्याचे दफनविधी करण्यासाठी मोठा खर्च येत आहे. तरी शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी ही होताना दिसत आहे. बोरगाव परिसरात सुमारे दीडशेहून अधिक जनावरांना या रोगाचे लागण झाले आहे. अनेक पशुपालक चिंतेत आहेत. ही समस्या निवारण करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. पण जनावरे हाती लागत नसल्याने शेतकरी बरोबरच पशुपालकांना मोठ्या आर्थिक संकटासमोरी जावे लागत आहे.
रोगाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. तरीही पशुपालक घाबरून न जाता त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय आरोग्य केंद्र संपर्क साधावा. या ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे. व औषधी देण्यात येत आहे. पशुपालकांना याबाबत जनजागृती करण्यात येत असून रोग आटोक्यात आणण्यासाठी आपण प्रशासनाच्या सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे यावेळी पशुवैद्यकीय केंद्राचे अधिकारी सागर पांडव यांनी यावेळी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta