बेळगाव जर्नालिस्ट असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : बेळगाव जर्नालिस्ट असोसिएशन यांच्यावतीने आज जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना अनेक सुविधेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी व्यत्यय येत आहे.यामुळे सर्व पत्रकारांना आरोग्य कार्डचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी यावेळी बेळगाव जर्नालिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे …
Read More »LOCAL NEWS
शाहूनगर शिव मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन
बेळगाव : महाशिवरात्रीनिमित्त शिव महापूजेचे आयोजन करण्यात आले. शाहूनगर व नेहरूनगर मंदिर ट्रस्ट कमिटीतर्फे येथील शिव मंदिरामध्ये महापूजा करून दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर कमिटीचे अध्यक्ष श्री. तुकाराम पाटील तसेच शाहूनगर येथील अध्यक्ष श्री. श्रीकांत कदम व इतर ट्रस्टचे सदस्य व युवक …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायतीला जिल्हाधिकाऱ्यांची धावती भेट
बेळगाव : बुधवार दि. ०२ फेब्रुवारी रोजी सकाळी येळ्ळूर ग्राम पंचायतीला बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी धावती भेट घेतली. यावेळी एम. जी. हिरेमठ यांना येळ्ळूर ग्राम पंचायतीकडून ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी पंचायतचे नूतनीकरण केलेल्या कामाची पाहणी करून …
Read More »बेळगावचे 17 विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये अडकले : जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ
बेळगाव : युक्रेनमध्ये अजूनही 17 वैद्यकीय विद्यार्थी अडकून आहेत असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले. बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी स्पष्ट केले की, बेळगाव येथील एकूण 19 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. त्यापैकी दोन विद्यार्थी सुखरूप परतले आहेत, तर उर्वरित 17 विद्यार्थ्यांना आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी तहसीलदारांना …
Read More »’जातीवाद आणि शैक्षणिक व्यवस्थेनं माझ्या मुलाला मारून टाकले’
नवीनचे वडील शेखरप्पा ग्यानगौडर यांची खंत हावेरी : आठवड्यापासून सुरू असलेले युद्ध सगळे खाद्यपदार्थ संपलेले भुकेने व्याकुळ होणारा जीव अशा अवस्थेत मंगळवारी सकाळी तो घरातून बाहेर पडला किराणा दुकानासमोर दोन तास रांगेत उभा राहिला पण त्याला खाद्यपदार्थ मिळण्याआधीच नवीन शेखरप्पा रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबाराचा शिकार ठरला कर्नाटकाच्या हावेरी जिल्ह्यातील चळगेरी …
Read More »वाय. पी. नाईक यांना गुरूगौरव पुरस्कारने सन्मानीत
बेळगाव : कावळेवाडी गावातील राष्ट्रपिता महात्मा गांधी वाचनालयाचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांना नुकताच सावंतवाडी येथे कोकण महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह यांच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात नाईक यांना गुरुगौरव पुरस्कार मान्यवर उपस्थित प्रदान करण्यात आला. वाय. पी. नाईक हे सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून शिक्षणासारख्या …
Read More »शाळा नं. 5 चव्हाट गल्ली येथे मराठी भाषा दिन व सेवानिवृती समारंभ संपन्न
बेळगाव : चव्हाट गल्ली बेळगाव येथील मराठी शाळा नं. 5 येथे मराठी भाषा दिन व सेवानिवृती समारंभ असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठा समाज सुधारणा मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. शिवराज पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. दिपक किल्लेकर उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. …
Read More »चेकमेट स्कूल ऑफ चेस या बुद्धिबळ प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे सुयश
बेळगाव : अजय चेस अकॅडमी यांच्यावतीने आयोजित दोन दिवशीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत चेकमेट स्कूल ऑफ चेस या बुद्धीबळ प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. दिनांक 26 व 27 फेब्रुवारी अशा दोन दिवस घेण्यात आलेल्या या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात रईस अहमद खान या बुद्धिबळपटूने दुसरा क्रमांक पटकावून …
Read More »रांगोळी प्रदर्शनातून अवतरले विज्ञानाचे धडे!
कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेमध्ये 28 फेब्रुवारी अर्थातच राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून रांगोळीतून विविध आकृत्या रेखाटून त्याची माहिती विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात दिली. त्यामुळे रांगोळीतून विज्ञानाचे धडे अवतरल्याचे प्रदर्शनात पहावयास मिळाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन कॅन्टोन्मेंटच्या महसूल अधिकारी प्रियंका पेटकर यांच्या हस्ते …
Read More »शहापूर मुक्तीधाम स्मशानभूमीत महाशिवरात्री उत्सव भक्तीभावात
बेळगाव : सालाबादप्रमाणे या वर्षीही शहापूर येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. असे म्हणतात की भगवान शंकराचा वास हा स्मशानात असतो, स्मशानातील भस्म शरीराला लावून भोळा शंकर स्मशानात राहत असे अश्या आख्यायिका प्रचलित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्रास हिंदू स्मशानात शिवालय असते. तसेच एक शिवालय शहापूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta