बेळगाव : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ या फलकावरून उसळलेल्या दंगली संदर्भातील खटल्याच्या आज गुरुवारी झालेल्या सुनावणीप्रसंगी 8 कार्यकर्ते गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ या फलकावरून उसळलेल्या दंगली संदर्भातील खटला गेल्या 6 वर्षापासून सुरु …
Read More »LOCAL NEWS
घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट नव्या कार्यकारिणीची निवड
बेळगाव : श्री घुमटमाळ मारुती मंदिर पब्लिक ट्रस्ट, हिंदवाडीच्या अध्यक्षपदी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री. चंद्रकांत बांडगी यांची आगामी वर्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मावळते अध्यक्ष अनंत लाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी कुलदीप भेकणे यांची तर चिटणीसपदी प्रकाश माहेश्वरी यांची निवड झाली आहे. …
Read More »पत्रकारांवरील हल्ले : जिल्हाधिकार्यांना निवेदन
बेळगाव : राज्यात पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ बेळगावातील उर्दू-हिंदी पत्रकार संघटनेतर्फे आज बुधवारी जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले. बेळगावातील उर्दू-हिंदी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष इक्बाल जकाती यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर केले गेले. जिल्हाधिकार्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या संदर्भात बोलताना अध्यक्ष इक्बाल जकाती …
Read More »रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे सरदार्स हायस्कूलमध्ये शिष्यवृत्ती पुस्तकांचे वाटप
बेळगाव (वार्ता) : येथील सरकारी सरदार्स हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम यांच्यावतीने राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची पुस्तके वाटप करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन. एम. मदनभावी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष अरविंद खडबडी, रो. सी. एस. व्ही. आचार्य, रो. उमेश रामगुरवाडी, रो. प्रसाद कट्टी …
Read More »पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
बेळगाव : अथणी ग्रामीण पाणीपुरवठा आणि निर्मल्य खात्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता आणि कार्यालय व्यवस्थापक अशा दोघा जणांना लाच स्वीकारताना भ्रष्टाचार निर्मूलन पथकाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. अथणी ग्रामीणचे सहाय्यक कार्यकारी अभियंता राजेंद्र इंद्रप्पा वर्णाकर आणि कार्यालय व्यवस्थापक दीपक कृष्णाजी कुलकर्णी अशी एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या अधिकार्यांची नांवे आहेत. एका …
Read More »भटक्या कुत्र्यांचा बकर्यांच्या कळपावर हल्ला : 6 बकरी ठार
बेळगाव : शाळेच्या आवारात बसवलेल्या बकर्यांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला करून 6 बकर्यांना ठार केले. या हल्ल्यात 3 बकरी गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना शिवबसव नगरातील कन्नड शाळेच्या आवारात काल रात्री घडली. बेळगाव तालुक्यातील मुतगा गावचे मेंढपाळ नरसू रायप्पा कुंपी आणि अन्य 7-8 मेंढपाळांच्या सुमारे 400 बकर्यांचा कळप …
Read More »28 पासून यल्लमा देवस्थान होणार खुले
बेळगाव : कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवस्थान येत्या मंगळवार दि. 28 सप्टेंबरपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील चार प्रमुख देवस्थानांसह आता श्री यल्लमा देवस्थान खुले होणार असल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू …
Read More »बेळवट्टी – कर्ले रस्ता पावसामुळे गेला वाहून
बेळगाव : बेळवट्टी ते कर्ले रस्ता पावसामुळे कर्ले शिवरातून वाहून गेला आहे तसेच २ कि.मी. रास्ता हा पूर्णतः खड्डयांनी व्यापला आहे. त्यामुळे सदर रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच बेळवट्टी गावाशेजारील असलेला पूलही अर्धा वाहून गेल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः धोक्याची झाली आहे. तरी या भागातील …
Read More »कंग्राळीत जलजीवन मिशन योजनेला प्रारंभ
बेळगाव : कंग्राळी (खु.) येथील केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेचा प्रारंभ खा. मंगला अंगडी व आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यातून ग्रामस्थांना घरोघरी नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या योजनेसाठी 4 कोर्टीचा निधी मंजूर झाला आहे. प्रारंभी ग्रा. पं. …
Read More »मुख्यमंत्री बोम्माई 25, 26 रोजी बेळगावात
बेळगाव : राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई येत्या शनिवार दि. 25 व रविवार दि. 26 सप्टेंबर असे सलग दोन दिवस बेळगाव दौर्यावर येणार असून ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये विजय झालेल्या भाजपच्या उमेदवारांनी नुकतीच बेंगलोर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण लवकरच बेळगाव दौर्यावर येत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta