बेंगळुरू : राज्यातील १० महानगरपालिकांनी विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी बंदची हाक दिली आहे आणि संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १० महानगरपालिका ८ जुलै रोजी पूर्ण दिवस बंद पाळतील आणि महानगरपालिकांचे कर्मचारी सामूहिक रजा घेऊन निषेध करतील. बेळगाव महानगरपालिका आणि बीबीएमपीसह राज्यातील १० महानगरपालिकांचे कर्मचारी विविध मागण्या पूर्ण …
Read More »LOCAL NEWS
गोकाक यात्रेत बंदोबस्तातील एएसआयचे हृदयविकाराने निधन
बेळगाव : गोकाक येथील यात्रेच्या बंदोबस्तासाठी नियुक्त असलेले सहायक उपनिरीक्षक लालसाब मिरानायक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज सकाळी ६.३० च्या सुमारास गोकाक शहरातील एस.सी./एस.टी. वसतिगृहात वास्तव्यास असलेले हुबळी एपीएमसी पोलिस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक ललासाब जीवनसाब मिरानायक (वय ५६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले. मृत लालसाब यांनी …
Read More »विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द सोसायटीतर्फे सुहास गुर्जर यांचा सत्कार
बेळगाव : सुहास गुर्जर यांनी रिलाएबल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात उत्तुंग यश मिळवून बेळगांवचे नाव परदेशात उज्वल केले. पण याबाबतचा गर्व त्यांनी कधी केला नाही. हा त्यांचा गुण वाखाणण्यासारखा आहे, असे उद् गार कॉलेज रोड येथील सुप्रसिध्द विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रा. दत्ता नाडगौडा यांनी काढले. …
Read More »गोकाक यात्रेवेळी हवेत गोळीबार प्रकरणी : रमेश जारकीहोळी यांच्या मुलाविरुद्ध एफआयआर दाखल
बेळगाव : गोकाक यात्रेत दरम्यान हवेत गोळीबार केल्याच्या प्रकरणावरून भाजप आमदार रमेश जारकीहोळी यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश जारकीहोळी यांचा मुलगा संतोष जारकीहोळी यांच्याविरुद्ध गोकाक शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील लक्ष्मी देवी यात्रेवेळी संतोष जारकीहोळी यांनी पोलिस आणि जनतेच्या …
Read More »पाटील मळा येथील जुने दुमजली घर कोसळून मोठे नुकसान
बेळगाव : मुसळधार पावसामुळे शहरातील ठिकठिकाणी जीर्ण घरे कोसळत असून पाटील मळा येथील एक सुमारे 85 वर्षे जुने दुमजली घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी घडली. सदर घर रामचंद्र गांधी यांच्या मालकीचे असून 1940 मध्ये ते बांधण्यात आले होते. त्यामुळे काळानुसार या घराचे बांधकाम जीर्ण …
Read More »विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा : संत मीरा, अनगोळ शाळेला दुहेरी मुकुट
बेळगाव : गणेशपुररोड येथील गुड शेफर्ड शाळेचे आवारातील बेळगाव टर्फ मैदानावर संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा गणेशपुर हे हिंडलगा आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक मुलांच्या गटातील फुटबॉल स्पर्धेचे दुहेरी विजेतेपद अनगोळच्या संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने पटकाविले. तर खानापूरच्या शांतीनिकेतन स्कूलला उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले. प्राथमिक …
Read More »भाजप नेते प्रवीण नेत्तारू हत्या प्रकरण: फरार आरोपीला अटक
बंगळूर : भाजप युवा मोर्चा सदस्य प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला अटक केली. एनआयएच्या पथकाने कतारहून आलेल्या आरोपी अब्दुल रहमानला आज कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतले आहे. प्रवीण नेत्तारूच्या हत्येप्रकरणी एनआयएने आधीच २१ आरोपींना अटक केली …
Read More »फौजदारी मानहानीचा खटला : शिवकुमारविरुद्धच्या खटल्याला उच्च न्यायालयाने दिली स्थगिती
बंगळूर : उच्च न्यायालयाने शुक्रवारी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात ‘भ्रष्टाचार दर यादी’च्या नावाखाली जाहिरात प्रकाशित केल्याच्या आरोपाखाली उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध राज्य भाजप शाखेने दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीला स्थगिती दिली. या प्रकरणातील सह-आरोपी कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) लाही न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला. भाजप विधान परिषदेचे …
Read More »मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीवर बंदी
बेळगाव : बेळगाव शहरात मोहरम सणानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून बेळगाव शहर आणि बेळगाव तालुक्यात शनिवारी (जुलै 05) मद्य विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश शहर पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी जारी केले आहेत. बेळगाव शहरात मोहरम सणाचा शेवटचा दिवस मिरवणुकीचा आहे, त्यामुळे मोहरम मिरवणुकीदरम्यान कोणत्याही अप्रिय घटना घडू …
Read More »गोवावेस जवळील अनुग्रह हॉटेलला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
बेळगाव : गोवावेस येथील अनुग्रह या हॉटेलमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काल मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने त्यावेळी हॉटेलमध्ये कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हॉटेलमधील पेटणाऱ्या फर्निचरच्या आवाजाने जागे झालेल्या आसपासच्या लोकांनी आगीची माहिती हॉटेलचे मालक सुधाकर पुजारी यांना दिली. त्याचप्रमाणे तात्काळ अग्निशामक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta