बेळगाव : वडगाव पशुचिकित्सालयातर्फे सरकारच्या आदेशाप्रमाणे सर्व कुत्र्यांना रेबिजचे लसिकरण करुन जनतेला भयापासून मुक्त करा असा आदेश आल्याने आज गुरुवार दि. 2/10/2025 रोजी सकाळी मनपा कर्मचारी तसेच वडगाव पशुचिकित्सालयाचे मुख्य डॉक्टर कट्याण्णावर तसेच सहकारी डॉक्टरांच्या मदतीने वडगावमध्ये फिरणाऱ्या भटकी कुत्री तसेच घरी पाळलेल्या कुत्र्यांना रेबिज लसिकरण करण्यात आले. यामुळे …
Read More »LOCAL NEWS
दोनशे वर्षांची परंपरा लाभलेला शहापूरचा श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिभावात
बेळगाव : विजयादशमी निमित्त बेळगाव आणि शहापूरच्या दोनशे वर्षाची परंपरा असलेल्या श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. शेकडो भक्त रथोत्सवात सहभागी झाले होते. वेंकट रमण गोविंदा, गोविंदा असा जयघोष करत भक्त रथ ओढत होते. रथाच्या मार्गांवर सडे घालून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ठिकाठिकाणी सुहासिनी रथाला आरती करत …
Read More »मराठी विद्यानिकेतनतर्फे गांधी जयंती निमित्त पूरग्रस्तानसाठी मदतीचे आवाहन
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेतर्फे 2 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने महाराष्ट्र-कर्नाटक तसेच भारतभरात यावर्षी अतिवृष्टीने थैमान घातले असून अनेक शेतकऱ्यांची शेते, घरे पाण्याखाली बुडाली आहेत. यामध्ये प्रचंड असे नुकसान झाले आहे. या भीषण पुरस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यांना …
Read More »बेळगांव ग्रामीण युवा काँग्रेसच्यावतीने पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल
बेळगाव : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपा प्रवक्ता पिंटू महादेव यांच्याविरुद्ध बेळगाव पोलीस आयुक्तांकडे बेळगांव ग्रामीण युवा काँग्रेस यांच्यावतीने युवा नेता मृणाल दादा हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली तक्रार दाखल करण्यात आली. बेळगाव पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांनी तक्रार स्वीकारली. यावेळी उचगांव ब्लॉक युवा …
Read More »पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेन : मुख्यमंत्री सिध्दरामय्या
बंगळूर : कर्नाटकात नेतृत्वाची चर्चा सुरू असताना, ते त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी स्पष्ट केले. कुनिगलचे आमदार एच. डी. रंगनाथ यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पदभार स्वीकारावा असे म्हटले होते. “मी पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ मुख्यमंत्री राहीन,” असे …
Read More »विश्व विख्यात म्हैसूर दसऱ्याची आज जंबो सवारीने होणार सांगता
देश – विदेशातील पर्यटकांची गर्दी; मिरवणुकीची जय्यत तयारी बंगळूर : राज्याचा प्रमुख सण असलेल्या दसरा महोत्सवातील सर्वात महत्वाचे आकर्षण असलेल्या जंबोसावरी मिरवणुकीसाठी पॅलेस सिटी पूर्णपणे सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुपारी १ ते १.१८ दरम्यान, शुभ धनुर लग्नादरम्यान राजवाड्याच्या उत्तर (बलराम) दारावर नंदीध्वजाची पूजा करून मिरवणुकीचे उद्घाटन करतील. ते …
Read More »‘बेधडक शक्तीस्वरूप 2025’ उत्कृष्ट देवीमूर्ती स्पर्धेचा निकाल जाहीर
बेळगाव (प्रतिनिधी) : बेधडक बेळगाव आयोजित ‘बेधडक शक्तीस्वरूप 2025 उत्कृष्ट देवीमूर्ती स्पर्धा’ मोठ्या उत्साहात पार पडली. विविध मंडळांनी साकारलेल्या कलात्मक व भक्तिभावपूर्ण देवीमूर्तींपैकी सर्वोत्तम मूर्तींना पारितोषिके जाहीर करण्यात आली. निकाल पुढीलप्रमाणे : 🥇 प्रथम क्रमांक – बेळगावची मानाची आई भवानी, सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, STM समर्थ नगर, बेळगाव 🥈 …
Read More »राज्यात पुरामुळे ८.६० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान – बैरेगौडा
बंगळूर : काही जिल्ह्यांमध्ये, विशेषतः उत्तर कर्नाटक प्रदेशात, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत ८.६० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, असे महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी सांगितले. भीमा नदीला आलेल्या पुराचे आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीचे स्वतंत्र सर्वेक्षण केले जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले. भीमा नदीत दररोज २.८ लाख क्युसेक इतके …
Read More »बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सीमोल्लंघन मैदान पाहणी केली
बेळगाव : बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सीमोल्लंघन मैदान (मराठी विद्यानिकेतन) पाहणी केली व येणाऱ्या 02 ऑक्टोबर 2025 विजयादशमी दिवसाच्या नियोजनाबद्दल माहिती घेतली आणि सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे शिस्तबद्ध नियोजनासाठी आदेश दिले. याप्रसंगी दसरा महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास …
Read More »समाजसेविका माधुरी जाधव यांच्यातर्फे काडा अध्यक्ष युवराज कदम यांचा सत्कार
बेळगाव : बेळगाव ग्रामीण काँग्रेसचे नेते युवराज कदम यांची नुकतीच काडाच्या अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजसेविका माधुरी जाधव (पाटील), श्वेता खांडेकर, मनोहर बेळगावकर, पद्मराज, संतोष कांबळे आदी उपस्थित होते.
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta