बेळगाव : 8 डिसेंबर पासून सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असताना कर्नाटक राज्य रायता संघ आणि हसरू सेना यांनी 11 डिसेंबर रोजी बेळगावात भव्य शेतकरी आंदोलनाची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन असून यासंदर्भात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना …
Read More »LOCAL NEWS
तालुका म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक शनिवारी
बेळगाव : बेळगाव येथे होत असलेल्या कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाला प्रतिउत्तर देण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत विचार विनिमय करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शनिवार दिनांक २२ रोजी दुपारी ठीक १.०० वाजता मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिज येथे आयोजित करण्यात …
Read More »श्री. व सौ. लक्ष्मीबाई कोंडुस्कर प्रतिष्ठानतर्फे वैकुंठधाम रथामुळे झाली सामान्यांची सोय
चोवीस तास मोफत शववाहिका उपलब्ध : ग्रामीण भागातही मिळतेय सेवा बेळगाव : महिना भरापूर्वी म्हणजेच दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर श्रीराम सेना हिंदुस्थान आणि श्री. व सौ. लक्ष्मीबाई कोंडुस्कर प्रतिष्ठानतर्फे वैकुंठधाम रथाचे लोकार्पण करण्यात आले. या रथामुळे गरीब आणि सामान्य लोकांची सोय झाली असून या मोफत सेवेचे कौतुक होत आहे. आता …
Read More »येळ्ळूर शिवाजी रोड- मारुती गल्ली कॉर्नर येथे विद्युत बोअरवेल मंजूर
बेळगाव : येळ्ळूर येथील वॉर्ड नंबर 4 व 5 मधील शिवाजी रोड मारुती गल्ली कॉर्नर येथील बोअरवेल गेली कित्येक वर्षे हॅन्डपम्प असल्याने वारंवार बंद पडत होती. यामुळे शिवाजी रोड दुकान मालक व स्थानिक नागरिकांनी वॉर्ड क्रमांक 4 चे विद्यमान सदस्य व ग्रा. पं. माजी अध्यक्ष सतीश बा. पाटील यांना …
Read More »दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा
बेळगाव : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात 19 नोव्हेंबर 2025 रोजी कार्तिक अमावस्या अर्थात देव दिवाळीनिमित्त भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून विधिवत पूजेला सुरुवात करण्यात आली होती. सकाळी पहाटे रुद्राभिषेक, विशेष आकर्षक पुष्परचना तसेच लोणी पूजनाने धार्मिक विधीचे सुरुवात करण्यात आली. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रीग …
Read More »समिती नेत्यांवरील खटल्याची पुढील सुनावणी 27 जानेवारी 2026 रोजी
बेळगाव : मराठी कागदपत्रांसाठी काढलेल्या मोर्चात प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत म. ए. समिती नेत्यांवर घातलेल्या खटल्यांची सुनावणी गुरुवारी होणार होती. मात्र पुन्हा सदर खटल्यांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी 27 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी …
Read More »ऊस तोडण्याच्या यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू
अथणी : अथणी तालुक्यातील सप्तसागर गावात ऊस तोडण्याच्या यंत्रात अडकून एका शेतकरी महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव शोभा श्रीकांत संक्रती (५४) असे आहे. स्वतःच्या शेतात ऊस तोडताना यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू झाला. अथणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More »कॉम्रेड किशोर ढमाले, प्रा. प्रतिमा परदेशी यांना संयुक्तपणे राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार जाहीर
बेळगाव : यंदाचा राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार पुणे येथील सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते कॉम्रेड किशोर ढमाले व प्रा. प्रतिमा परदेशी यांना संयुक्तपणे देण्यात येणार आहे. पुरस्कार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते. गुरुवार दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी …
Read More »शहापूरमध्ये जुगार खेळणाऱ्या पाच जणांना अटक
बेळगाव : शहापूर पोलिसांनी जुने बेळगाव स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई १७ नोव्हेंबरला करण्यात आली. पोलिसांच्या पथकाला येथे अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पथकाची स्थापना करून छापा टाकून कारवाई केली. कारवाईत हमीद इनुशा कागजी (वय ४४, होसूर …
Read More »कपिलेश्वर कॉलनी येथील श्री रिद्धी सिद्धी विनायक मंदिरात दीपोत्सव उत्साहात साजरा
बेळगाव : कपिलेश्वर कॉलनी येथील श्री रिद्धी सिद्धी विनायक मंदिरात श्री रिद्धी सिद्धी महिला मंडळातर्फे दीपोत्सवाचा भव्य, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण जल्लोष करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा दिव्य सोहळा मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला. संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने, आकर्षक सजावटीने आणि उत्सवी उत्साहाने उजळून निघाला होता. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta