Sunday , July 26 2026
Breaking News

ऊसाने भरलेली ट्रॉली उलटल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Spread the love

 

अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील येल्लमावाडी गावात ऊसाने भरलेली ट्रॉली उलटल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

मृताचे नाव रामप्पा निंगप्पा सावळगी (४०) असे आहे. अमावस्येनिमित्त यल्लमा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला.

सावळगी-अथणी राज्य महामार्गावर काम सुरू असताना, ऊसाने भरलेला ट्रॅक्टर जवळच असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटला आणि दुचाकीस्वार ट्रॅक्टरच्या खाली सापडला. ऐगळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *