लोकप्रतिनिधी न्यायालयाचे निर्देश; निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे उकळल्याचा आरोप बंगळूर : येथील लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतर नेत्यांविरुद्ध आता रद्द केलेल्या निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे उकळल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने बंगळुरमधील टिळक नगर पोलीस ठाण्याला निवडणूक बाँड योजनेशी संबंधित फसवणुकीच्या आरोपांची …
Read More »LOCAL NEWS
महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात विविध संघटनांच्या वतीने सोमवारी भव्य निषेध मोर्चा
बेळगाव : महानगरपालिकेच्या भ्रष्ट आणि ढिसाळ कारभारामुळे कोट्यवधींच्या विकासकामावर पाणी सोडण्याची वेळ बेळगाव महानगरपालिकेवर आली आहे. लोकप्रतिनिधींच्या हुकूमशाहीमुळे महानगपालिकेवर ही नामुष्की ओढवली असल्याची खंत जाणकार व्यक्त करत आहेत. बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते ओल्ड पी.बी. रोड रास्ता तसेच खंजर गल्ली येथील रस्ता हे एक ताजे उदाहरण आहे. अशी अनेक …
Read More »खादरवाडी येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्याला अखेर यश
बेळगाव : खादरवाडी येथील जागेचा वादअखेर संपुष्टात आला. बक्कप्पाची वारी या 120 एकर जमिनीसाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्याला अखेर यश आले असून सदर जमीन मूळ शेतकऱ्यांच्या नावे झाल्याचे समजते. मागील दीड वर्षपासून हा जागेचा वाद सुरू होता. शेतकऱ्यांनी जमीन परत मिळविण्यासाठी विविध मार्गाने आंदोलने करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला …
Read More »आमदार मुनीरत्न यांच्या निवासस्थानी एसआयटीचा छापा
बेंगळुरू : बलात्कार, जातीवाचक शिवीगाळ आणि धमकी प्रकरणी तुरुंगात असलेले भाजप आमदार मुनीरत्न यांना एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. दरम्यान, एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी पहाटे मुनीरत्न यांच्या निवासस्थानी छापा टाकला. एसआयटी एसीपी कविता यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला असून मुनीरत्नच्या घरासह एकूण 15 ठिकाणी छापे टाकण्यात आले असून त्यांची तपासणी …
Read More »माझा राजीनामा मागण्याची भाजपला नैतिकता आहे का?; मुख्यमंत्री सिध्दरामय्यांचा सवाल
बंगळूर : केंद्र सरकारकडून राजभवनाचा गैरवापर केला जात आहे. माझा राजीनामा मागण्यासाठी भाजपकडे कोणती नैतिकता आहे? मी काही चूक केली नाही, त्यामुळे मी राजीनामा देणार नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. म्हैसूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मंडकल्ली विमानतळावर आगमन झाल्यावर काँग्रेस नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी …
Read More »नवरात्रोत्सवासंदर्भात उद्या महत्वपूर्ण बैठक
बेळगाव : शारदीय नवरात्र उत्सव व दसरा महोत्सव बेळगाव येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या संदर्भात उद्या शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता जत्तीमठ देवस्थान सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला विविध देवस्थानचे पदाधिकारी, पंच मंडळ, विविध युवक मंडळ यांची संयुक्त बैठक संपन्न …
Read More »प्राचीन हिन्दी भाषेचा प्रत्येकाने सम्मान करावा : डॉ. मोहनदास नैमिशराय
बेळगाव : हिंदी भाषेला खूप मोठा इतिहास आहे. हिंदी भाषेचे साहित्य समृद्ध आहे. आजच्या सोशल मीडियामुळे हिंदी भाषेची लोकप्रियता वाढत आहे. हिंदी भाषेला काका कालेलकर, सेठ गोविंददास आणि हजारी प्रसाद द्विवेदी यांनी गौरव प्राप्त करुन दिला आहे. हिंदी भाषा युनोस्कोने सुद्धा महत्व दिलेले आहे, असे प्रतिपादन नई दिल्ली येथील …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात लोकायुक्तमध्ये एफआयआर दाखल
बेंगळुरू : मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात म्हैसूर लोकायुक्तात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लोकायुक्त एडीजीपी मनीष करबीकर यांच्या सूचनेनुसार म्हैसूर लोकायुक्त एसपी उदेश यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध सीआरपीसी कलमांतर्गत एफआयआर दाखल केले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या एफआयआरमध्ये ए 1, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी पार्वती ए 2, पार्वती यांचा …
Read More »राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे राणी पार्वती देवी महाविद्यालयात स्थलांतर
एम ए मराठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बेळगाव : इसवी सन 2010 साली स्थापन झालेले बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठ हे कर्नाटकातील नामांकित विद्यापीठांपैकी एक आहे. 351 संलग्न महाविद्यालये, 21 पदव्युत्तर विभाग, एक घटक महाविद्यालय, चार स्वायत्त महाविद्यालये, डिप्लोमा कार्यक्रम, सर्टिफिकेट कोर्स, पंडित दीनदयाळ उपाध्याय अध्यासन, राणी चन्नम्मा अध्यासन, …
Read More »मराठा समाज सुधारणा मंडळाची रविवारी वार्षिक सभा
बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. मेलगे गल्ली, शहापूर येथील मंडळाच्या वास्तूत सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या या सभेस मंडळाच्या सर्व आजीव सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे व कार्याध्यक्ष शिवराज पाटील यांनी केले आहे.
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta