Thursday , September 19 2024
Breaking News

LOCAL NEWS

कॅपिटल वनतर्फे ओमकार शाम सुतार यांचा सत्कार

  बेळगाव : नुकत्याच झालेल्या सी. ए. परीक्षेमध्ये घवघवित यश संपादन केलेल्या संस्थेचे संस्थेचे सभासद ओमकार शाम सुतार यांचा नुकताच संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून ओमकार यांचे अभिनंदन केले. आपल्या जिज्ञासू वृत्तीमुळेच कु.ओमकार याने हे यश संपादन केले असेही नमूद करून भविष्यात …

Read More »

येळ्ळूरमधील समस्या सोडवण्यासाठी आमदार अभय पाटील यांना नागरिकांचे निवेदन

  येळ्ळूर : येळ्ळूर गावामधील समस्या तात्काळ सोडवाव्यात यासाठी सिद्धेश्वर गल्ली येळ्ळूर येथील नागरिकांनी बेळगाव दक्षिण दक्षिण भागाचे आमदार अभय पाटील यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सिद्धेश्वर गल्लीच्या समोर असलेला येळ्ळूरमधील महत्त्वाचा चौक म्हणजे लक्ष्मी चौक होय. या चौकात सर्वत्र पेव्हर्स बसवून या चौकाचे सुशोभीकरण करावे, तसेच सिद्धेश्वर …

Read More »

चारित्र्याच्या संशयावरून मुडलगी तालुक्यात एकाचा निर्घृण खून

  मुडलगी : बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील लक्ष्मीश्वर गावात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीसह एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, मौलासाब यासीन मोमीन (28) हा आपल्या दुचाकीवरून शिल्पा नामक महिलेला घेऊन जात असताना शिल्पाचा पती …

Read More »

हुबळी येथील वैष्णवी देवी मंदिराच्या पुजाऱ्याची भीषण हत्या

  हुबळी : हुबळी ईश्वर नगर येथील वैष्णवी देवी मंदिराच्या पुजाऱ्याची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने नागरिकांतून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैष्णव देवी मंदिराचे पुजारी देवप्पाज्जा यांचा अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला करून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या वर्षी देखील एका पुजाऱ्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला होता. पण …

Read More »

माधुरी जाधव फाउंडेशन यांच्या माध्यमातून अपंग मुलीला सायकलचे वितरण

  बेळगाव : आनंदवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या किशोरी पवार यांची 9 वर्षीय कन्या सिद्धी पवार ही मुलगी इयत्ता तिसरी वर्गात शिकत असून जन्मल्यापासून ती अपंग आहे. तिला चालता येत नाही. किशोरी या आपल्या मुलीला शाळेला रोज कडेवर घेऊन आणतात आणि सोडतात. हे दृश्य समाजसेविका माधुरी जाधव यांच्या निदर्शनास आले. माधुरी …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट

  शिरूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज उत्तर कन्नड जिल्ह्यातील विविध भागात पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. मुख्यमंत्री रविवारी सुट्टीच्या दिवशीही विश्रांती न घेता जिल्हा दौऱ्यावर गेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, त्यांनी कारवार जिल्ह्यातील शिरुर येथील दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच …

Read More »

गुरुपौर्णिमेनिमित्त कंग्राळ गल्ली येथे आयुष्यमान कार्डची नोंदणी

  बेळगाव : आज कंग्राळ गल्ली येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयुष्यमान कार्डची विनामूल्य नोंदणी करण्यात आली. गल्लीतील सर्व नागरिकांना याचा लाभ मिळावा या उद्देशाने गल्लीतील युवकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन गल्लीतील पंचमंडळीच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. शंकर बडवाण्णाचे, …

Read More »

‘आयटी कर्मचाऱ्यांनी १४ तास काम करावे’, कर्नाटकच्या प्रस्तावावर कामगार संघटनाची नाराजी

  बंगळुरू : कर्नाटक हे आयटी कंपन्यांचे हब मानले जाते. बंगळुरूमध्ये अनेक आयटी कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. जगभरातील आयटी प्रोफेशनल याठिकाणी काम करतात. आता कर्नाटकमधील आयटी कंपन्यांचा एक निर्णय वादात अडकला आहे. येथील आयटी कंपन्यांनी कर्नाटक सरकारला कर्मचाऱ्यांचा कामाचा दिवस १४ तासांचा करण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावाचा आता कामगार …

Read More »

प्रगती इंजिनिअरिंगमध्ये वृक्षारोपण

  बेळगाव : सामाजिक आणि निसर्गाप्रती असणारी जाणिव राखत प्रगती इंजिनिअरिंग बेळगाव प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कामगार आणि ग्रीन सेविअर बेळगाव यांनी वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात वनमहोत्सव साजरा केला. रविवारी स्वदेशी 60 पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली. त्यावेळी ग्रीन सेविअर ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. जयंत लिंगडे सर तसेच प्रगती इंजीनियरिंगचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. …

Read More »

कर्नाटकातील काही जिल्ह्यात २२ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जाहीर

  बंगळुरू : कर्नाटक राज्यात पावसाचा जोर कायम आहे. घाट परिसरात मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे डोंगराळ भागात परिस्थिती चिंताजनक बनली आहे. पाऊस सतत पडत असून 21 आणि 22 जुलै रोजी हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. किनारपट्टी आणि पर्वतीय भागात …

Read More »