Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

नेदरलँड येथील तांत्रिक विद्यापीठाकडून आर्किटेक्ट स्नेहल हन्नूरकर यांना अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट

  बेळगाव : नेदरलँड येथील तांत्रिक विद्यापीठाकडून आर्किटेक्ट स्नेहल हन्नूरकर यांना अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट बहाल करण्यात आली. बायो बेसड पॅव्हीलियन प्रकल्पाची एकूण संरचना आणि कार्यान्वयन कार्यातील यशाबद्दल त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली.या प्रकल्पासाठी त्यांनी जैविक आणि जैविक आधारित साहित्याचा शोध घेऊन त्याची सखोल रचना, त्यातील नवीनतम डिझाईन आणि त्याच्या बांधणी …

Read More »

समितीकडे साधना पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणूक लढविणार असल्यामुळे समितीच्यावतीने आज मंगळवार दि. २ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला कार्यकर्त्या श्रीमती साधना सागर पाटील यांनी समितीच्या रंगुबाई पॅलेस कार्यालयात आपला उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. येथे मदन बामणे, अंकुश …

Read More »

बेळगावात बीम्स हॉस्पिटलतर्फे मतदान जनजागृती जथा

  बेळगाव : बेळगावातील बीम्स हॉस्पिटल आणि बीम्स संस्थेतर्फे आज शहरात मतदान जनजागृती जथ्याचे आयोजन करण्यात आले होते. एक मत ही देशाच्या विकासाची नांदी आहे. मतदान ही लोकशाहीत संधी आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीतमतदानापासून वंचित राहू नये यासाठी बेळगाव बीम्स हॉस्पिटलच्या वतीने जनजागृती जथ्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी नितेश …

Read More »

घरगुती वापरासाठीच्या विज दरात प्रति युनिट १.१० रुपये कपात

  आजपासून प्रभावी; १५ वर्षात प्रथमच वीज दरात कपात बंगळूर : राज्यात पंधरा वर्षांनंतर प्रथमच वीज वापर दरात कपात करण्यात आली आहे. दर कपात आजपासून लागू होणार असून मे महिन्यात देण्यात येणाऱ्या बिलाना ती लागू होणार आहे. कर्नाटक वीज नियामक आयोगाने (केईआरसी) गेल्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये वार्षिक कार्यवाही केली आणि …

Read More »

बाची चेकपोस्टवर ६.६५ लाख रुपये जप्त

  बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक-महाराष्ट्र सीमा चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. सोमवारी मध्यरात्री निवडणूक कर्मचाऱ्यांनी बेळगाव तालुक्यातील बाची चेकपोस्टवर कागदपत्रांशिवाय वाहतूक होत असलेले ६.६५ लाख रुपये जप्त केले. या प्रकरणी अमूल विद्याधर यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. निवडणूक …

Read More »

लाल- पिवळ्या ध्वजाला प्रशासनाचे “अभय”!

  बेळगाव : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे पालिका प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले जाहिराती फलक, भगव्या पताका, भगवे ध्वज त्याचप्रमाणे इतर जाती-धर्मांचे ध्वज काढण्यात आले आहेत. मात्र ही कारवाई करत असताना प्रशासनाने मात्र लाल पिवळ्या ध्वजाला झुकते माप दिले आहे. त्यामुळे लाल-पिवळ्या ध्वजाला आचारसंहितेची नियमावली लागू पडत नाहीत की …

Read More »

बेळगाव लोकसभेसाठी समिती देणार उमेदवार! ३२ जणांच्या निवड समितीमध्ये शिक्कामोर्तब!

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने लोकसभेला एक उमेदवार देण्यावर ३२ जणांच्या निवड समितीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऍड. राजाभाऊ पाटील होते. मंगळवार दिनांक २ एप्रिल २०२४ ते ६ एप्रिल २०२४ पर्यंत रोज दुपारी ३.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत रंगुबाई पॅलेस येथे अर्ज स्वीकारण्यात येतील ही …

Read More »

बेळगावात जेएमएफसी न्यायालयासमोर करणीबाधा

  बेळगाव : चक्क न्यायदेवतेच्या मंदिरासमोरच अंधश्रद्धेतून करणीबाधेचे साहित्य ठेवल्याचा खळबळजनक प्रकार आज बेळगावात उघडकीस आला. बेळगावातील चन्नम्मा चौकाजवळील नव्या जेएमएफसी न्यायालय कॉम्प्लेक्सच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गुलालाने माखलेला नारळ, लाल-काळे पाणी भरलेले प्लास्टिक ग्लास, तांदूळ, काळ्या बाहुल्या, लिंबू असे चित्रविचित्र साहित्य एका पत्रावळीत भरून अज्ञातांनी ठेवून दिल्याचे आज सकाळी उघडकीस आले. …

Read More »

कावळेवाडीतील पारायण सोहळ्याची सांगता

  बेळगाव : कावळेवाडीतील (ता. बेळगाव) वारकरी मंडळातर्फे आयोजित ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची भक्तिभावाने सांगता झाली. यानिमित्त रोज काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, गाथा भजन, महिला भजन, नामजप, कीर्तन निरुपण आदी कार्यक्रम झाले. अधिष्ठान मारुती पाटील यांचे होते. पहिल्या दिवशी दिंडी, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन निरूपण, जागर भजन असे कार्यक्रम झाले. पारायण सोहळ्यात …

Read More »

लोकसभा उमेदवार निवडीसंदर्भात समितीच्या 32 जणांची कमिटी जाहीर

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचा लोकसभा उमेदवार निवडीसंदर्भात 32 जणांची कमिटी जाहीर करण्यात आली आहे. बेळगांव दक्षिण मधील 11, उत्तर मधील 11 आणि ग्रामीण मधील 10 अशा एकूण समितीच्या 32 कार्यकर्त्यांची निवड कमिटी स्थापन करण्यात आली आहे. सदर कमिटी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करणार आहे. या संदर्भात विचारविनिमय …

Read More »