Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

कर्नाटकात ‘घराणेशाही’चा सर्वपक्षीय उदो उदो..!

  बंगळुरू : कर्नाटकातील २८ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहेत. या निवडणुकीसाठीचे सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर होत असून या पक्षांनी घराणेशाहीला विरोध करण्याऐवजी उदो उदो करीत आपापल्या नातेवाईकांना उमेदवारी मिळवून दिलेली आहे. काँग्रेस पक्षाने आतापर्यंत दोन उमेदवार याद्या जाहीर केल्या. दुसऱ्या यादीमध्ये राज्य मंत्रिमंडळातील पाच वरिष्ठ …

Read More »

भ्रष्ट अधिकाऱ्याच्या घरावर छापा; 27 लाख रु. जप्त

  बेळगाव : पंचायत राज अभियांत्रिकी उपविभाग खानापूर येथे नरेगाच्या कामांना तांत्रिक मान्यता देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याकडून लाच घेत असताना दुरदुंडेश्वर बन्नुर या अधिकाऱ्याला दि. 26 रोजी सापळा रचून त्याला अटक करण्यात यश आले. बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावात या अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली असता, त्यामध्ये तब्बल 50 लाख रुपयांचा …

Read More »

मैत्रेयी कलामंच समुहातर्फे महिला दिन साजरा

  बेळगाव : २०१९ पासून समाजसेवेत कार्यरत असणाऱ्या मैत्रेयी कलामंच समुहातर्फे या वर्षीचा महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आपणही समाजाचे काही देणे लागतो हे नजरेसमोर ठेवून थोडी रक्कम जमा करून हे मंडळ वर्षभर अनेक उपक्रम कोणाच्याही मदतीशिवाय राबवत असते. अडचणीत असलेल्या महिलांना मदतीचा हात पुढे करत असते. दरवर्षी …

Read More »

बेळगावात जगदीश शेट्टर यांचे उत्स्फूर्त स्वागत!

  बेळगाव : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या वतीने बेळगावात बी. एस. येडियुरप्पा यांनी जोरदार प्रचार केला. लोकसभेचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी सकाळी हिरेबागेवाडी टोलनाक्यावरून बेळगाव गाठले. किल्ला दुर्गादेवी मंदिरात पूजाअर्चा केल्यानंतर बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. पक्षाचा लोगो असलेले भगवे फेटे, शाल परिधान करून पक्षाचा झेंडा हातात घेऊन कार्यकर्ते …

Read More »

शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक शुक्रवारी

  बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक शुक्रवार दिनांक 29 मार्च 2024 रोजी दुपारी दोन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांची मते आजमावण्यात येणार आहेत तरी सर्व पदाधिकारी व …

Read More »

समिती कार्यकर्त्यांचे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना पत्र…

  बेळगाव : लोकसभा निवडणूक २०२४ नुकतीच जाहीर झाली आहे, महाराष्ट्रात लोकशाहीचा हा उत्सव साजरा करताना सीमावासीयांना आपण विसरू नये. गेली ६८ वर्षे सिमावासीय पारतंत्र्यात असल्यासारखे जगत आहेत, भाषिक अत्याचार आम्ही सहन करत आहेत, कर्नाटक सरकारने १९८६ साली शिक्षणात कन्नडसक्ती लागू केलीच, पण गेल्या महिनाभरापूर्वी कन्नडसक्ती कायदा पारित करून येथील …

Read More »

जगदीश शेट्टर यांचे बेळगावात होणार आज जंगी स्वागत

  बेळगाव : माजी मुख्यमंत्री व बेळगाव लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जगदीश शेट्टर यांचे आज बुधवार 27 मार्च रोजी सकाळी दहा वाजता हिरेबागेवाडी मार्गे बेळगावात येणार आहेत. हजारो भाजपा कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता हिरेबागेवाडी टोलनाकाच्या मार्गे आगमन होऊन 10.30 वाजता किल्ला …

Read More »

नेत्यांची समजूत काढण्यासाठी येडियुरप्पा उद्या बेळगावात

  बेळगाव : गो बॅक जगदीश शेट्टर मोहिमे बरोबरच उमेदवारीपासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील नेत्यांची समजूत काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा बुधवारी बेळगावात येणार आहेत. बेळगावचे तिकीट जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच बेळगाव दौऱ्यावर येणारे येडियुरप्पा, जगदीश शेट्टर यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. यापुर्वी उमेदवारीपासून वंचित राहिलेल्या भाजप नेत्यांनी शेट्टर यांच्याविरोधात गो …

Read More »

ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये दाखल : जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पाठविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे. बेळगाव शहरातील हिंडलगा गावातील भारतीय निवडणूक आयोगाच्या गोदामातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे मंगळवारी आज (२६ मार्च) कडेकोट बंदोबस्तात संबंधित विधानसभा मतदान केंद्रांवर पाठवण्यात …

Read More »

बेळगावात रंगपंचमी जल्लोषात साजरी

  बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात आज जल्लोषात रंगोत्सव साजरा करण्यात आला. सोमवारी सकाळपासूनच रंगीबेरंगी रंगांची उधळण करत गल्लोगल्ली रंगोत्सवाला उधाण आले होते. शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, कॉलेज रोड, सीपीएड मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. अनेक ठिकाणी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या …

Read More »