बेळगाव : पंचायत राज अभियांत्रिकी उपविभाग खानापूर येथे नरेगाच्या कामांना तांत्रिक मान्यता देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याकडून लाच घेत असताना दुरदुंडेश्वर बन्नुर या अधिकाऱ्याला दि. 26 रोजी सापळा रचून त्याला अटक करण्यात यश आले.
बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावात या अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली असता, त्यामध्ये तब्बल 50 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. 27,75,000 रोख रक्कम व मौल्यवान वस्तू आढळून आल्या असून पुढील तपासासाठी रोख रक्कम जप्त करण्यात आली असून तपास सुरू आहे.