Wednesday , July 9 2025
Breaking News

जगदीश शेट्टर यांचे बेळगावात होणार आज जंगी स्वागत

Spread the love

 

बेळगाव : माजी मुख्यमंत्री व बेळगाव लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जगदीश शेट्टर यांचे आज बुधवार 27 मार्च रोजी सकाळी दहा वाजता हिरेबागेवाडी मार्गे बेळगावात येणार आहेत. हजारो भाजपा कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

सकाळी 10 वाजता हिरेबागेवाडी टोलनाकाच्या मार्गे आगमन होऊन 10.30 वाजता किल्ला दुर्गा देवी मंदिरमध्ये पूजा कार्यक्रम करून नंतर हजारोंच्या संख्येने तिथून बाईक रॅलीला सुरुवात होईल व पुढे रॅलीचा मार्ग खाली दिल्या प्रमाणे राहील.

कोर्ट आवारातील क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या मूर्तीला मालार्पण करून पुढे राणी चन्नमा यांच्या मूर्तीला मालार्पण होईल, पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला मालार्पण करून, राणी चन्नमा सर्कल मधील गणपती मंदिरमध्ये आरती होईल, पुढे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीला मालार्पण करून, कपिलेश्वर मंदिरच्या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला मालार्पण होईल, नंतर महात्मा फुले रोड मार्गावरून गोवावेस मधील जगत ज्योती बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तीला मालार्पण करून, सदाशिवनगर मधील भाजपा महानगरच्या कार्यालयाजवळ या बाईक रॅलीची सांगता होईल, असे कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शहापूर येथील जोशी मळ्यात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहरात बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *