बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक शुक्रवार दिनांक 29 मार्च 2024 रोजी दुपारी दोन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांची मते आजमावण्यात येणार आहेत तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित रहावे, अशी विनंती शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. दीपक दळवी आणि तालुका समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले आहे.