Monday , September 21 2026
Breaking News

नेत्यांची समजूत काढण्यासाठी येडियुरप्पा उद्या बेळगावात

Spread the love

 

बेळगाव : गो बॅक जगदीश शेट्टर मोहिमे बरोबरच उमेदवारीपासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील नेत्यांची समजूत काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा बुधवारी बेळगावात येणार आहेत.

बेळगावचे तिकीट जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच बेळगाव दौऱ्यावर येणारे येडियुरप्पा, जगदीश शेट्टर यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. यापुर्वी उमेदवारीपासून वंचित राहिलेल्या भाजप नेत्यांनी शेट्टर यांच्याविरोधात गो बॅकचे हत्यार वापरले होते. या पार्श्वभूमीवर पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी येडियुरप्पा स्वतः रिंगणात उतरले आहेत.

हिरेबागेवाडी गावात कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. यानंतर ते शहरातील अनेक मंदिरांना भेटी देऊन विशेष प्रार्थना करतील आणि त्यानंतर पक्ष कार्यालयाला भेट देणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *