Tuesday , April 7 2026
Breaking News

LOCAL NEWS

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला २० जागा

  मुख्यमंत्र्यांचा विश्वास; उमेदवार निवडीत गोंधळ नसल्याचा दावा बंगळूर : विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यातील जनतेला दिलेल्या पाच हमी योजनांची पूर्तता करून आम्ही वचनपूर्ती केली आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत राज्यातील २० मतदारसंघात विजय निश्चित असल्याचा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या प्रलंबित याद्या आज किंवा उद्या जाहीर करू. उमेदवार निवडीबाबत …

Read More »

कर्नाटकाला विशेष अनुदान दिले नसल्याचा आरोप पूर्णपणे खोटा

  केंद्रीय मंत्री सितारामन; कर्नाटकाच्या याचिकेवर प्रतिक्रीया बंगळूर : दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी (एनडीआरएफ) अंतर्गत तातडीने अनुदान देण्याचे निर्देश केंद्राला द्यावेत यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी दिली होती. त्यावर त्यावर प्रतिक्रीया देताना केंद्रीय वित्त मंत्री निर्मला …

Read More »

बेकायदा दत्तक प्रकरण; सोशल मीडिया स्टार सोनू गौडा हिला अटक

  रायचूर : अल्पवयीन मुलाला बेकायदेशीरपणे दत्तक घेतल्याप्रकरणी प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार सोनू गौडा हिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणासंदर्भात पोलीस आणि अधिकाऱ्यांनी त्या मुलाला मूळ गावी रायचूरला घेऊन गेले आहेत. सोनू गौडा हिने नुकताच रायचूरमधील एका मुलाला दत्तक घेतल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. पण सोनू गौडावर बेकायदेशीरपणे मूल …

Read More »

गांजाची अवैध विक्री; आरोपीला अटक

  बेळगाव : बेळगावच्या गणाचारी गल्लीत अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला खडेबाजार पोलिसांनी अटक केली. आकाश सुनील परीट असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणाचारी गल्लीत गांजा विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला. छाप्यादरम्यान 176 ग्रॅम गांजा, मोबाईल फोन आणि 14,200 रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली.

Read More »

दहावी परीक्षेस उद्यापासून प्रारंभ

  बेळगाव : विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाची मानल्या दहावीच्या परीक्षेला सोमवार (ता. २५) पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण केली असून रविवारी विविध परीक्षा केंद्रांवर दहावीच्या विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक घालण्याचे काम पूर्ण केले जाणार असून रंगपंचमी दिवशी दहावीचा पहिला पेपर पार पडणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर …

Read More »

समिती विस्तारामुळे सीमालढ्याला बळकटी मिळणार; रणजित चव्हाण -पाटील यांची कार्याध्यक्षपदी निवड

  बेळगाव : शहर समितीच्या विस्तारामुळे सीमालढ्याला बळकटी मिळणार असून नवीन युवा कार्यकर्ते लढ्यासोबत जोडले जात आहेत. त्यामुळे समितीला बळकटी प्राप्त होत आहे, असे विचार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नवीन कार्यकारिणीची बैठक शनिवारी मराठा मंदिर येथे पार पडली. महादेव पाटील यांनी प्रास्तविकात, सीमालढ्यात …

Read More »

भरधाव मोटारसायकल दुभाजकाला आदळून दोघा जणांचा मृत्यू

  बेळगाव : भरधाव मोटारसायकल दुभाजकाला आदळून मोटारसायकलवरून खाली पडल्याने दोघा जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्री पहिल्या रेल्वेगेटजवळ ही घटना घडली असून शनिवारी वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. ऍड. अभिषेक मुत्ताप्पा कित्तूर (वय ३२) रा. राणी चन्नम्मानगर व किरण रमेश अळगुंडी (वय २३) रा. गोकाक …

Read More »

होळी व रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर-तालुक्यात दोन दिवस दारूबंदी

  बेळगाव : होळी व रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व तालुक्यात दोन दिवस दारूविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्बनिंग यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. बेळगाव शहर व उपनगरात रविवार दि. २४ मार्चच्या दुपारी २ पासून सोमवारी २५ मार्चच्या मध्यरात्री ११.५९ पर्यंत वाईन शॉप, …

Read More »

एनडीआरएफ अनुदानासाठी कर्नाटकाची सर्वोच्च न्यायालयात दाद

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; पाच महिन्याच्या प्रतिक्षेनंतर निर्णय बंगळूर : राज्याला केंद्रीय आपत्ती निवारण (एनडीआरएफ) निधी तातडीने देण्याचे केंद्राला निर्देश द्यावेत, अशी मागणी करत आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ते आज देतील, उद्या देतील, आज येतील, उद्या येतील, अशी पाच महिने वाट पाहिली. आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Read More »

धजदला तीन मतदारसंघ; भाजपची अधिकृत घोषणा

  बंगळूर : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, भाजप आणि धजद यांच्यातील जागा वाटप अखेर निश्चित झाले आहे. भारतीय जनता पक्षाने कर्नाटकातील २८ मतदारसंघांपैकी हसन, मंड्या आणि कोलार लोकसभा मतदारसंघ धर्मनिरपेक्ष जनता दलाला (धजद) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागावाटपाच्या अनिश्चिततेचा तिढा आता सुटला आहे. यासंदर्भात कर्नाटक भाजपचे …

Read More »