बेळगाव : बेळगावच्या गणाचारी गल्लीत अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला खडेबाजार पोलिसांनी अटक केली.
आकाश सुनील परीट असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणाचारी गल्लीत गांजा विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला. छाप्यादरम्यान 176 ग्रॅम गांजा, मोबाईल फोन आणि 14,200 रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली.