Friday , November 6 2026
Breaking News

होळी व रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर-तालुक्यात दोन दिवस दारूबंदी

Spread the love

 

बेळगाव : होळी व रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व तालुक्यात दोन दिवस दारूविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्बनिंग यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.
बेळगाव शहर व उपनगरात रविवार दि. २४ मार्चच्या दुपारी २ पासून सोमवारी २५ मार्चच्या मध्यरात्री ११.५९ पर्यंत वाईन शॉप, बार, दारू दुकाने बंद ठेवण्याचा आदेश बजावण्यात आला असून, क्लब व हॉटेलमध्येही या काळात दारूपुरवठा करू नये, अशी सूचना केली आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर अबकारी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे. अबकारी निरीक्षक व अबकारी अधीक्षकांनी यासाठी योग्य कारवाई करण्याची सूचनाही पोलीस आयुक्तांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *