Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

हिरेबागेवाडी पोलिसांकडून दरोडेखोरांना अटक

बेळगाव : निवृत्त वनअधिकाऱ्यांचे भर रस्त्यात अपहरण करून 20 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती अशी की, 31 जुलै रोजी सेवानिवृत्त वनअधिक्षक धारवाड येथे जात असताना पाच दरोडेखोरांनी स्कॉर्पिओ गाडी अडवून सुमारे 4 लाखाचा ऐवज लुटला तसेच निवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण करून 20 लाख …

Read More »

संतांनी दाखवलेला समाज कल्याणचा मार्ग आचरणात आणावा : किरण जाधव

बेळगाव : श्री नाभिक समाज सुधारणा मंडळ यांच्या वतीने श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला. श्री संत शिरोमणी सेना महाराजांची पुजा करून कार्यकर्त्यांशी व पदाधिकार्‍यांशी संवाद साधताना मराठा समाजाचे नेते किरण जाधव म्हणाले की, संतांनी दाखवलेला समाज कल्याणचा मार्ग, त्यांचे ज्ञान तसेच स्वतःच्या त्यागाने व आचरणाने …

Read More »

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील बस सेवा सुरळीत करा

बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येणार्‍या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बसची सेवा सुरळीत करण्यात यावी, या मागणीचे निवेदन युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली केएसआरटीसी विभागीय नियंत्रण अधिकार्‍यांना देण्यात आले. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांत एकही सण साजरे होऊ शकले नाहीत. यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे ग्रामीण …

Read More »

मराठा मंडळ पदवीपूर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

  बेळगाव : बेळगाव पदवीपूर्व शिक्षण खाते उपनिर्देशक (डीडीपीयुई) व नायकर सोसायटी यांचे रविंद्रनाथ टागोर पदवीपूर्व कॉलेज, बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय क्रिडास्पर्धा 2022-23 यांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिडास्पर्धामध्ये मराठा मंडळ पदवीपूर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. कॉलेजमधून एकूण 196 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. सांघीक …

Read More »

केपीटीसीएल परीक्षा गैरप्रकार प्रकरणी 9 जणांना अटक

  बेळगाव : केपीटीसीएलच्या कनिष्ठ सहाय्यक परीक्षा बेकायदेशीर प्रकरणाची गंभीर दखल घेतलेल्या एसपी डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाला 9 जणांना अटक करण्यात आले आहे. बेळगावचे एसपी डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने प्रकरणाच्या मुळापर्यंत जात 9 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या 7 ऑगस्ट रोजी केपीटीसीएलने कनिष्ठ सहाय्यक पदासाठी …

Read More »

पंत बाळेकुंद्री खुर्द गावच्या विकासकामासंबंधीचा धनादेश सुपूर्द

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील पंत बाळेकुंद्री खुर्द गावाला आमदार निधी तसेच विधान परिषद निधीतून असे दुप्पट अनुदान मिळाले. आम. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आमदार निधीतून 7 लाख रूपये मंदिराच्या कम्युनिटी हॉलच्या बांधकामासोबतच चन्नराज हट्टीहोळी यांच्या विधान परिषद निधीतूनही 5 लाखाच्या निधीतून शाळेची खोली बांधण्यात येणार आहे. चन्नराज हट्टीहोळी यांनी …

Read More »

फुलबाग गल्ली येथे समाज प्रमुखांसमवेत आमदार अनिल बेनके यांची बैठक

  बेळगाव : सोमवार दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी फुलबाग गल्ली येथे समाज प्रमुखांसमवेत बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी बैठक घेतली. बेळगांव उत्तर भागातील चालु असलेली विविध विकासकामे तसेच आगामी विकासकामांबद्दल आमदार अनिल बेनके यांनी समाज प्रमुखांची बैठक घेतली आणि समाजप्रमुखांच्या मागणीनुसार बेळगांवमध्ये लवकरच हायटेक गो-शाळा बांधण्यात येणार …

Read More »

सार्वजनिक श्रीगणेशोत्सव महामंडळाकडून विविध मागण्यांसंदर्भात पोलिस आयुक्तांना निवेदन सादर

  बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्रीगणेशोत्सव महामंडळ बेळगावतर्फे पोलिस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. प्रामुख्याने गणेशोत्सव काळात उदभवणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. शहरात सुमारे 357 हुन अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. या मंडळांना विविध परवानग्या घ्याव्या लागतात त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जुन्या मनपा इमारतीत, टिळकवाडी येथील येथील मनपा कार्यालय, तसेच …

Read More »

जारकीहोळींना घरी पाठविणेचा कत्तींनी विडा उचलला…

संकेश्वर  (महंमद मोमीन) : यमकनमर्डी विधानसभा मतदार संघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांना घरी पाठविणेचा विडा राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी उचलला आहे. नुकत्याच पार पडलेल्या मारुती अष्टगी अभिनंदन कार्यक्रमात मंत्रिमहोदयांनी जारकीहोळी यांना पाठवून देण्याची भाषा केली आहे. मंत्री उमेश कत्तीं म्हणाले, हुक्केरी विधानसभेची निवडणूक मी …

Read More »

ग्रंथपाल ग्रंथालयाचा कणा आहे : प्रा. स्वरूपा इनामदार

  बेळगाव : कोणत्याही ग्रंथालयाचे ग्रंथपाल स्वतः जबाबदारी घेऊन काम करत असतात. पुस्तकांची ठेवण, त्यांचे जतन, हाताळणी, वाचकांशी सुसंवाद, साहित्यिक उपक्रमाचे आयोजन अशी विविधांगी कामे काळजीपूर्वक करतात म्हणून ग्रंथपाल हा ग्रंथालयाचा कणा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका प्रा. स्वरूपा इनामदार यांनी काढले. ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने तारांगण व जननी ट्रस्टच्या वतीने …

Read More »