Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

जीसीएल ग्राहकांसाठी वर्षभर मोफत खाद्यतेल : सलोनी घोडावत

  बेळगाव : व्यापार क्षेत्रात प्रगतीपथावर असलेल्या घोडावत उद्योग समूहातर्फे बेळगाव धारवाड आणि हुबळी येथे स्टार लोकल मार्ट स्टोअर तसेच अन्य आऊटलेटच्या माध्यमातून घोडावत कन्झ्युमर लिमिटेडची (जीसीएल) उत्पादने येत्या शनिवार 11 मार्चपासून उपलब्ध होणार असून सदाशिवनगर बेळगाव येथील स्टार लोकल मार्ट स्टोअरमध्ये जीसीएल उत्पादनांची सर्वाधिक खरेदी करणाऱ्या पहिल्या 50 ग्राहकांना …

Read More »

बेळगाव सीमाभाग शिवसेनेतर्फे शिवजयंती साजरी

  बेळगाव : सालाबाद प्रमाणे बेळगाव जिल्हा शिवसेना (सीमाभाग-उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातर्फे तिथीनुसार आज शुक्रवारी सकाळी शके 1944 फाल्गुन वद्य तृतीयेला श्री शिवजयंती साजरी करण्यात आली. शहापूर येथील श्री छत्रपती शिवाजी उद्यानामध्ये या शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्या …

Read More »

जखमी गवंडी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

  बेळगाव : जखमी गवंडी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हलगा येथील यल्लाप्पा मोनाप्पा मोरे (वय वर्षे ५७) असे या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. शुक्रवार दिनांक १० रोजी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यल्लाप्पा मोरे हा गवंडी काम करत होता. गवंडी काम करत असताना इमारतीवरून चार दिवसांपूर्वी पडून तो जखमी …

Read More »

गाडी पळविण्याच्या जंगी शर्यतीतील विजेत्यांना रोख पारितोषिक

  बेळगाव : श्री शेतकरी संघटना मजगाव यांच्यावतीने आणि भाजप राज्य ओबीसी युवा मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव यांच्या सहकार्याने दिनांक 4 व 5 मार्च रोजी झालेल्या रिकामी गाडी पळविण्याच्या जंगी शर्यतीतील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मजगाव, महामार्गावर ही शर्यत झाली होती. बैलगाडी पूजन …

Read More »

उचगाव येथे पारायण सोहळ्याला प्रारंभ

  उचगाव : श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळा मार्कंडेय नदीकिनारी उचगाव येथे तुकाराम बीज ते नाथ षष्ठी अखेर आज पासून सुरुवात करण्यात आली असून मंगळवार दिनांक 14 मार्च रोजी काला कीर्तनाने या पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे. हभ प बाळू भक्तीकर आणि हभप गोपाळ मरूचे यांच्या अधिष्ठानखाली या पारायण …

Read More »

19 मार्चच्या शुद्धीकरण कार्यक्रमाला राजहंसगडवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांचे आवाहन

  बेळगाव : राष्ट्रीय पक्षांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दोन वेळा अनावरण करून आणि त्यांचा वापर राजकारणासाठी करून मोठा अपमान केला आहे. याविरोधात मराठी माणसाने पेटून उठले पाहिजे. संघटित झालो तरच मराठी माणसांची ताकद वाढणार आहे. त्यामुळे 19 मार्च रोजीच्या दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण कार्यक्रमाला राजहंसगडवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, …

Read More »

पोलिसांवर हल्ला प्रकरण; शिवप्रेमींची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : पोलिसांवर हल्ला करणे आणि डिजेचा कर्णकर्कश आवाज करून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणांतून चार शिवप्रेमींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. विजय मोहिते, गजानन डोंगरे, सतीश घसारी, दुर्गेश घसारी (सर्व रा. टेंगिनकेरा गल्ली) अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या चित्ररथ देखाव्यावेळी त्यांनी हा हल्ला केल्याचा …

Read More »

मल्लिकार्जुन वृद्धाश्रमामध्ये एंजल फाउंडेशनच्या वतीने महिला दिन साजरा

  बेळगाव : शाहूनगर येथील श्री मल्लिकार्जुन वृद्धाश्रममध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. वृद्धाश्रमातील आजींच्या हस्ते केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला. तसेच आश्रमातील आजींना बिस्कीट, पुलावचे वाटप सुद्धा करण्यात आले. एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या हस्ते वृद्धाश्रममधील आजींचा शाल …

Read More »

शहापूर परिसरातील विहिरींचे पाणी दुषित….!

  बेळगाव : गेल्या दोन वर्षांपासून खराब असलेली ड्रेनेज वाहिकेमुळे कोरे गल्ली येथील विहिरींचे पाणी दूषित झाले असून यासंबधी गेल्या महिनाभरात ७ ते ८ वेळा तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांच्याकडे करण्यात आली, पण हे तात्पुरती व्यवस्था करत असल्यामुळे पुन्हा पुन्हा ड्रेनेज वाहिका खराब तर होतच आहे पण विहिरी कायमस्वरुपी …

Read More »

आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू

  केंद्रीय पथक बंगळुरात दाखल; अधिकारी व राजकीय पक्षांशी चर्चा बंगळूर : राज्यात निवडणुकीचा ज्वर हळूहळू वाढत असतानाच, निवडणूक आयोगही स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी सर्व प्रकारची तयारी करत आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांचे आज तीन दिवसांसाठी राज्यात आगमन झाले. विधानसभा निवडणुकीच्या प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी राजकीय पक्षांसह …

Read More »