Monday , December 15 2025
Breaking News

LOCAL NEWS

एपीएमसी, रविवार पेठ उद्या बंद

बेळगाव : केंद्र सरकारने धान्य आणि डाळींवर 5 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात बेळगाव शहरातील धान्य व्यापाऱ्यांनी शनिवारी बंद पुकारला आहे. शनिवारी धान्यांची दुकाने बंद असणार आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली असून, तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. आहार धान्य आणि डाळींवर 5 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय चुकीचा आहे. …

Read More »

समर्थनगर येथे आढळला घोणस सर्प

  बेळगाव : समर्थनगर चौथा क्रॉस येथील रहिवासी विनायक कोकितकर यांच्या घराच्या मागील बाजूस 5.9 फूट लांबीचा घोणस जातीचा विषारी साप आढळून आला. कोकितकर यांनी लागलीच सर्पमित्र अक्षय हुंदरे यांना कळविले. अक्षय हुंदरे यांनी शिताफीने साप पकडून मंडोळीच्या डोंगरात सोडून दिले. यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सर्पमित्र अक्षय हुंदरे यांनी सांगितले …

Read More »

शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे जागतिक लोकसंख्या दिन व राष्ट्रीय विषाणूजन्य कार्यक्रम

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन व राष्ट्रीय विषाणूजन्य कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी श्री. चिदंबर अग्निहोत्री आणि प्रमुख पाहुणे म्हणून दीपा गट्टद मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या स्वागतगीताने …

Read More »

बेळगाव, खानापूर तालुक्यातील शाळांना सुट्टी..

बेळगाव : जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, पावसाचा जोर वाढल्याने बेळगाव शहर, बेळगाव तालुका आणि खानापूर तालुक्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना आज शुक्रवार (१५ जुलै) आणि उद्या शनिवार (१६ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Read More »

मुडलगी तालुक्यात विजेचा धक्का लागून लाईनमनचा मृत्यू

बेळगाव : मुडलगी तालुक्यातील तिगडी गावात ट्रान्सफॉर्मरमध्ये दुरुस्ती करताना लाईनमनचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तिगडी गावात हेस्कॉमचे कर्मचारी निंगाप्पा करीगौडर (38) यांचा विजेच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निंगाप्पा यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी निषेध व्यक्त केला आहे. कुलगोड पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.

Read More »

कर्नाटकाला मिळणार नऊ वॉटर एरोड्रोम; काळी नदी, अलमट्टी, हिडकल जलाशय येथे जल एरोड्रॉम्सची योजना

  बंगळूर : राज्यभरात नऊ वॉटर एरोड्रोम विकसित केले जातील, असे सांगून पायाभूत सुविधा विकास मंत्री व्ही. सोमण्णा यांनी बुधवारी सांगितले की, कर्नाटकला अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला चालना देताना विमानचालन-नेतृत्वाच्या विकासावर “टेक ऑफ” करण्यास त्यांची मदत होईल. कर्नाटकसाठी सर्वंकष नागरी विमान वाहतूक धोरण तयार करण्याबाबत राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सोमण्णा बोलत होते. …

Read More »

सांबरचे कातडे बाळगल्याप्रकरणी अरण्य खात्याकडून एकाला अटक

  बेळगाव : अरण्य खात्याच्या संचारी सीआयडी पथकाने कित्तुर येथे धाड टाकून एका व्यक्तीकडून सांबरचे कातडे जप्त केले. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव मधुकर गोपाळराव देशपांडे (५३) रा. गद्दी गल्ली, कित्तुर असे आहे. ही कारवाई अरण्य खात्याच्या सीआयडी संचारी पथकाच्या प्रमुख पीएसआय रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. मधुकर देशपांडे हे …

Read More »

बॉक्सिंग बेतली जीवावर, बंगळुरुत सामन्यादरम्यान जखमी बॉक्सरचा मृत्यू, आयोजकांवर गुन्हा दाखल

बेंगळुरू : एक धक्कादायक घटना कर्नाटकच्या बंगळुरु शहरातून समोर आली आहे. एका किकबॉक्सरला बॉक्सिंग सामन्यादरम्यान रिंगमध्ये गंभीर दुखापत झाल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. 23 वर्षीय मृत किक बॉक्सर हा म्हैसूरचा रहिवाशी असून निखिल एस. असं त्याचं नाव आहे. दरम्यान निखिलच्या आई-वडिलांनी तक्रार दिल्यानंतर सामने आयोजित करणाऱ्या आयोजकांविरुद्ध पोलिसांनी निष्काळजीपणाचा …

Read More »

बस पासपासून 50 टक्के विद्यार्थी वंचित

बेळगाव : शैक्षणिक वर्ष चालू होऊन तब्बल दीड महिना उलटला तरी अद्याप 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना बस पास मिळालेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. आत्तापर्यंत चाळीस हजार विद्यार्थ्यांना बस पास मिळाला आहे. मात्र अजूनही चाळीस हजारहून अधिक विद्यार्थ्यांना बस पास मिळण्याची आवश्यकता आहे. जुलै अखेरीस बाकीचे …

Read More »

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राईड सहेलीतर्फे रेहानला मदत

बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राईड सहेली व ऑपरेशन मदत यांच्यावतीने रेहान हलसंगी या आठवीच्या विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य व रेनकोट देण्यात आला. रेहान सरदार हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत असून त्याची आई सलमा हलसंगी या पेट्रोल पंपावर काम करतात. रेहान होतकरू असून त्याला शैक्षणिक साहित्याची गरज होती. त्यांनी प्राईड सहेलीच्या …

Read More »