Tuesday , March 3 2026
Breaking News

संंकेश्वर-गडहिंग्लज आगाराच्या बस धाऊ लागल्या…

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर-गडहिंग्लजला ये-जा करणार्‍या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हुक्केरी तालुका श्रीरामसेना हिन्दुस्तान आणि कोल्हापूर भाजपा पदाधिकार्‍यांनी संकेश्वर-गडहिंग्लज आगार व्यवस्थापकांना संकेश्वर-गडहिंगलज बस फेर्‍या सुरू करण्याचे निवेदन सादर केले. निवेदनाची सत्वर दखल घेऊन दोन्ही आगाराच्या व्यवस्थापकांनी 13 फेब्रुवारी 2022 बस फेर्‍या सुरू केल्या. गडहिंग्लज आगाराने संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावर लालपरीच्या फेर्‍या आणि संकेश्वर आगाराने आपल्या बसगाडीला हिरवा कंदील दाखविला. संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावर दोन्ही आगाराच्या बसफेर्‍या सुरु झाल्याने प्रवाशांतून आनंद व्यक्त केला जात आहे. संकेश्वर-गडहिंग्लज दोन्ही आगारातून बसफेर्‍या सुरु करण्याचे श्रेय श्रीरामसेना हिन्दुस्तान तालुका अध्यक्ष शाम यादव, कोल्हापूर जिल्हा युवामोर्चाचे उपाध्यक्ष लगमण्णा नवलाज, कोल्हापूर भाजपा शेतकरी आघाडीचे चिटणीस केंपण्णा मुगळी आणि कार्यकर्त्यांना द्यावे लागेल. श्रीरामसेना हिंदुस्तान आणि भाजपा पदाधिकार्‍यांचे विशेष अभिनंदन प्रवाशी वर्गातून केले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *