
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील श्री शंकरलिंग समुदाय भवन येथे रविवारी दि. ६ मार्च २०२२ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीत्वाचा उत्सव ‘स्वयंसिद्धा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी केले आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी म्हणाल्या, गेल्या वर्षी स्वयंसिद्धा कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. यावर्षी देखील कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती निश्चितच मोठी राहणार आहे. स्त्रियांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी केक तयार करणे, मेहंदी आणि केशरचना स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्त्रियांना प्रत्यक्ष सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. महिलांनी तयार केलेल्या रुचकर खाद्यपदार्थ, कपडे ज्वेलरीच्या पन्नास स्टाॅलची रचना करण्यात आली आहे. दुपारी १ वाजता स्टाॅलचा उद्घाटन सोहळा होणार असून मुख्य समारंभाला प्रमुख पाहुण्या श्रीमती शीला उमेश कत्तीं, श्रीमती जयश्री रमेश कत्ती उपस्थित राहणार आहेत. बेळगांवच्या प्रख्यात लेखिका माधुरी शानभाग यांचे मौलिक विचार महिलांना ऐकावयास मिळणार आहेत. मुख्य समारंभात विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक दिली जाणार आहेत. सायंकाळी सहानंतर मुलीं व महिलांचा संगीत नृत्य कलाविष्कार सादर कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta