
हरहर मोदी, हरहर योगींच्या जयघोषणा
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवाजी चौकात फटाक्यांच्या आताषबाजीने मिठाई वाटप करुन विजयोत्सव साजरा करण्यात आला. चार राज्यांत भाजपाने विजय संपादन केलेबदल मोदी-योगींचा जयजयकार करण्यात आला. यावेळी संकेश्वरातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, मोदी-योगींचा विजय असो, हरहर मोदी घरघर मोदींच्या जयघोषणांनी सारा आसमंत दणाणून सोडला होता. यावेळी भाजपाचे पदाधिकारी कुमार बस्तवाडी, किर्तीकुमार संघवी, संदिप गंजी, सचिन सपाटे, दीपक भिसे, बबलू मुडशी, जयप्रकाश सावंत, संदिप गोंधळी, भरमा पुजारी, शाम हालट्टी, उमेश फडी, राजू गुंडकल्ली, समर्थ पट्टणशेट्टी, निखिल मिर्जी, किरण शिरगांवी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta