संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात फळांचा राजा आंबा दाखल झाला आहे. देवगड हापूस आंब्याची जेमतेम आवक सुरु असून आंब्याचा प्रति डझन दर २ हजार रुपये आहे. हंगामाच्या प्रारंभीचा देवगड हापूस आंबा गोड रसाळ असला तरी तो केवळ धनीकांचा बनलेला दिसत आहे. आंब्याचा प्रति डझन दोन हजार रुपये दर सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या खिशाला परवडणारा नाहीय. येथील आंबा व्यापारी रियाज मुल्ला आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले हंगामाच्या प्रारंभी आंब्याचा दर जादा असणे सहाजिकच आहे. संकेश्वरात देवगड हापूसची आवक जेमतेम असून मागणी देखील तेवढीच राहिली आहे. त्यामुळे दररोज दोन बाॅक्स आंबा विक्री होऊ लागला आहे. संकेश्वरात फळांचा राजा थोड्या उशीराच दाखल झाला आहे. गुढिपाडव्यापर्यंत दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांना सध्या आंब्याचा दर निश्चितच परवडणारा नसल्याचे त्यांनी सांगितले.
Check Also
संकेश्वर बस स्थानकात अडीच तोळ्याचे दागिने लंपास
Spread the love संकेश्वर : येथील बस स्थानकात बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या पिशवीतील अडीच …