Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वरात “वॉकर्स वे”ची डॉ. सचिन मुरगुडे यांना श्रद्धांजली

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : बेनकेनहोळी येथे इनोव्हा-कंटेनर अपघातात मरण पावलेले संकेश्वरचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे, त्यांच्या पत्नी डॉ. श्वेता मुरगुडे, कन्या शिया यांना संकेश्वर वॉकर्स वे सदस्यांनी श्रध्दांजली वाहिली. यावेळी बोलताना वॉकर्स वे फ्रेंडसचे निवृत प्राध्यापक जी. एस. वाली म्हणाले, डॉ. सचिन मुरगुडे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. दररोज आमच्या बरोबर वॉकिंग करणारे डॉ. मुरगुडे आज आमच्यात नाहीत ही गोष्ट मनाला पटेनासी झाली आहे. शिवा बोरगांवी म्हणाले, आम्ही एका सच्चा मित्राला मुकलो आहोत. डाॅ. सचिन मुरगुडे रविवारी सकाळी आमच्याबरोबर होते. सायंकाळी अपघातात त्यांचे निधन झाल्याची बातमी धक्कादायक ठरली. अपघातात डॉ. सचिन, त्यांच्या पत्नी डॉ. श्वेता, कन्या शिया यांचे निधनाने सर्वांना मोठा आघात झाला आहे. विनोद संसुध्दी म्हणाले, संकेश्वरातील गोरगरिब कष्टकरी सर्वसामान्य लोकांचे डॉक्टर म्हणून डॉ. सचिन मुरगुडे यांचा नावलौकिक होता. त्यांच्या अपघाती निधनाने संकेश्वर वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते गजानन दुंडगे म्हणाले, डॉ. सचिन मुरगुडे, त्यांच्या पत्नी डॉ. श्वेता मुरगुडे कन्या शिया यांच्या अपघाती निधनाने संकेश्वरातील लोकांत हळहळ व्यक्त केली जात असल्याचे सांगितले. यावेळी वॉकर्स वे च्या फ्रेडसनी डॉ. सचिन मुरगुडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *