संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर रुक्मिणी गार्डन येथे टायनी टेल्स निर्मित कडेलोट..कडेकोट नाटक सादर करण्यात आले. त्याला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांचा सत्कार डॉ. मंदार हावळ यांनी केला. उपस्थितांचे स्वागत डॉ. स्मृती हावळ यांनी केले. इटालियन फ्रॅका रामे या लेखिकेने ७० च्या दशकात लिहिलेले हे नाटक अमोल पाटील यांनी अनुवादित केले आहे. दिग्दर्शक कल्पेश समेळ यांचे असून नेपथ्य मयुरेश माळवदे यांचे आहे. कलाकार प्रतिक्षा खासनिस यांनी एका बाईची गोष्ट उत्तम प्रकारे सादर केली. नाटकात स्त्रियांचे व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रतिक्षा खासनिस यांनी समरसपणे भूमिका मांडली. महिलांनी आवर्जून पहावे असे हे नाटक असून रुक्मिणी गार्डन येथे त्याचे दोन प्रयोग सादर करण्यात आले. नाटक आयोजक डॉ. स्मृती हावळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाल्या नाटकाच्या दोन्ही प्रयोगाला उत्तम प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी सांगितले.
Check Also
संकेश्वर बस स्थानकात अडीच तोळ्याचे दागिने लंपास
Spread the love संकेश्वर : येथील बस स्थानकात बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या पिशवीतील अडीच …