Wednesday , July 15 2026
Breaking News

सोमवारी खानापूर युवा समितीच्यावतीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देणार

Spread the love

खानापूर : कर्नाटकात शिक्षक भरती प्रक्रियेला लवकरच चालना मिळणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने शिक्षक भरतीवेळी मराठी माध्यमाला जास्तीत जास्त मराठी शिक्षक भरती करून अग्रस्थान द्यावे या मागणीसाठी सोमवार (ता. 21) रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव येथे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे.
तरी यावेळी खानापूर व बेळगाव तालुक्यातील मराठी भाषिक व शिक्षण प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, सचिव सदानंद पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

सीमा प्रश्न निकाली काढणे हेच एकमेव ध्येय : गोपाळ देसाई

Spread the love  मध्यवर्तीच्या कोणताही निर्णयात खानापूर समितीचा पाठिंबा खानापूर : मुंबई येथे ८ जुलै …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *