
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री दुर्गादेवी यात्रा महोत्सवाची सुरुवात आज देवीच्या मुखवटा मिरवणुकीने करण्यात आली. प्रति तीन वर्षाला श्री दुर्गादेवी पात्रोट समाज गोरक्षणमाळ यांच्यावतीने यात्रा साजरी केली जाते. येथील रंगांच्या चावडीपासून श्री दुर्गादेवी चांदीच्या मुखवट्याची मिरवणूक भंडाऱ्याची उधळण करीत सवाद्यसमवेत भक्तीमय वातावरणात काढण्यात आली. मिरवणुकीत श्री दुर्गादेवी पात्रोट समाज बांधव, महिला भक्तगण, श्री विश्वजित कन्नड युवक संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान सकाळी श्री.दुर्गाअन्नपूर्णेश्वरी भवनचे उदघाटन देवराज मनवडर यांचे हस्ते करण्यात आले. सायंकाळी आंबिल कलस मिरवणूक आणि महिलांचा ओटी भरणेचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. उद्या बुधवार दि. २३ रोजी सकाळी श्री दुर्गादेवी मंदिरात धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद वाटप आणि सायंकाळी भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta