

संकेश्वर (प्रतिनिधी) : संगोळी रायण्णा नगर येथील श्री गुप्तादेवी नूतन मंदिर वास्तू शांती आणि मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम उद्या मंगळवार दि. २९ रोजी सकाळी ९ वाजता निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात होत आहे. आज मार्केट यार्ड श्री गजानन मंदिर ते श्री गुप्तादेवी मंदिर पर्यंत श्री गुप्तादेवी मूर्तीची सवाद्य समवेत मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये सुवासिनी महिलां आरती आणि कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीत श्री गुप्तादेवीच्या नामघोषणांनी सार परिसर दणाणून गेला होता. फटाक्यांची तुफान आतिषबाजीही करण्यात आली. मिरवणूक भक्तीमय वातावरणात पार पडली. मिरवणुकीत चंद्रशेखर नडगदल्ली, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन क्वळी, नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी, रुपसिंग नाईक, महेश हळीजोळी, मलप्पा थरपट्टी, अप्पासाहेब वैरागी, संगमेश तवकरी, सचिन हेगडे, राजू हेब्बाळे, संतोष देसाई, गणेश नडगदल्ली, जयानंद चिनमुरी, रामप्पा मगदूम भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta