


संकेश्वर (प्रतिनिधी) : मनुष्याला आपल्या चुका सुधारून नव्याने जगण्याची उम्मीद देवालयातून मिळते. त्यामुळे माणसाच्या चुकांच्या माफीसाठी देवालय निर्माणचे कार्य केले जात असल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. स्वामीजी संकेश्वर संगोळ्ळी रायण्णा नगर येथील श्री गुप्तादेवी नूतन मंदिर उदघाटन, वास्तूशांती आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमात बोलत होते. श्रींच्या हस्ते गुप्पतादेवी, मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. नूतन श्री गुप्तादेवी मंदिराचे उदघाटन निडसोसी स्वामीजी आणि उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी यांच्या हस्ते फित सोडून करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत श्री गुप्तादेवी यात्रा महोत्सव कमिटीचे डॉ. जयप्रकाश करजगी यांनी केले.
श्री पुढे म्हणाले, भारतीय संस्कृतीत देवदेवतांमध्ये देवीचे महत्व अधिक आहे. नवदुर्गांमध्ये गुप्तादेवीचा समावेश होतो. मठ-मंदिर, देवालय ही माणसाला चांगल्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त करणारी आहेत. चुका माणसांकडून होणे हे सहाजिकच आहे.चुका सुधारुन नव्याने जगण्याची उम्मीद देवालयातून मिळते असे श्रींनी सांगितले. यावेळी चंद्रशेखर नडगदल्ली, नागपण्णा करजगी, गजानन क्वळी, गणेश नडगदल्ली, संतोष कमनुरी, शंकरराव हेगडे, राजू हेब्बाळे, अप्पासाहेब वैरागी, किरण करीकट्टी, ॲड.आणप्पा केस्ती, निंगप्पा इरण्णावर, सिध्दलिंग केरीमनी, नगरसेवक संजय शिरकोळी, डॉ. जयप्रकाश करजगी, विवेक क्वळी, संतोष मगदूम, अभिजित कुरणकर, चंद्रकांत वैरागी, रुपसिंग नाईक, महेश हळीजोळी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाप्रसादाचा लाभ भक्तगणांनी घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta