संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरमधील उपाध्ये चाळीतील नागरिकांना आज दिवसाढवळ्या पेटते पथदिवे पहावयास मिळाले. उपाध्ये चाळीत दिवसभर, त्यातच भर उन्हात देखील पथदिव्यांचा प्रकाश पडलेला दिसला. सुर्याच्या प्रखर प्रकाशात पथदिव्यांचा मिनमिनता प्रकाश झाकोळलेला दिसला. हुक्केरी विद्युत संघाच्या लापरवाहीमुळे की पालिकेच्या दुर्लक्षामुळे कोण जाणे पथदिवे मात्र दिवसभर पेटतेच दिसले. विजेची पाण्याची बचत करण्याची भाषा करणारेच विजेचा असा दुरुपयोग करु लागल्यामुळे लोकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संबंधित अधिकारींकडून दिवसा पेटत्या पथदिव्यांचे विज बिल वसूल करण्याची मागणी लोकांतून केली जात आहे.
Check Also
हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
Spread the love हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …