
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर येथील एकस्तासीस चिल्ड्रन्स होममधील अनाथ मुलांना दिवंगत सुपरस्टार पुनित राजकुमार यांचा सुपरहिट चित्रपट जेम्स पाहण्याचं सौख्य कु. हर्ष आनंद शिरकोळी यांनी मिळवून दिले आहे. येथील साईनाथ चित्रपटगृहात कुमार हर्षने ३० अनाथ मुलांचं तिकिट बुकिंग करून त्यांची जेम्स चित्रपट पहाण्याची इच्छा पूर्ण केली आहे. कु हर्ष एकस्तासीस चिल्ड्रन्स होम मधील एका कार्यक्रमात सहभागी झाला असता चिल्ड्रन्स होममधील अनाथ मुलांनी त्याच्याकडे जेम्स चित्रपट पहाण्याची इच्छा व्यक्त केली. अनाथ मुलांची जेम्स चित्रपट पहाण्याची इच्छा पूर्ण केलेबदल एकस्तासीस चिल्ड्रन्स होमच्या प्रमुख जेसी सॅम्युएल मंडाडी, संदिप एम.यांनी कु.हर्षचे कौतुक केले आहे. अनाथ मुलांना चित्रपट पहाण्यासाठी ने-आण करण्याचे कार्य प्रभाकर पाटील, दयानंद आलुरी, लाडजी मुल्तानी, प्रकाश शिंदे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta