संकेश्वर (वार्ता) : येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. नंदकुमार हावळ, डॉ. मंदार हावळ यांच्या सौजन्याने वल्लभगडावर आज संकेश्वर महाविद्यालयाच्या (एन.एस.एस.) विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेचे कार्य केले.
संकेश्वरजवळ असलेल्या वल्लभगडाला शिवकालिन इतिहास राहिला आहे. वल्लभगडाचे संवर्धन करण्याचे काम संकेश्वर दुर्गवीर प्रतिष्ठान आणि डॉ. मंदार हावळ परिवाराकडून केले जात आहे. संकेश्वर एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित कला-विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील एन.एस.एस. विद्यार्थ्यांनी गडावरील काटेरी झुडपे, केरकचरा हटवून स्वच्छतेचे कार्य करुन दाखविले.
यावेळी बोलताना डॉ.नंदकुमार हावळ म्हणाले, वल्लभगडाचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम सर्वांकडून होण्याची आवश्यकता आहे. वल्लभगडाला शिवकालीन इतिहास आहे. तो विद्यार्थ्यांना समजावून सांगायला हवा आहे. गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी सरकारने हाती घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. पी. एस. मुन्नोळी म्हणाले, डॉ. हावळ परिवाराने वल्लभगड स्वच्छता मोहिमेत आमच्या महाविद्यालयातील एन.एस.एस. विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळवून दिली. त्यामुळे वल्लभगडाच्या स्वच्छता अभियानाला आमचाही हातभर लागल्याचे सांगितले.
स्वच्छता अभियानमध्ये डॉ. नंदकुमार हावळ डॉ. मंदार हावळ, कॉलेजचे प्राचार्य पी. एस. मुन्नोळी, प्राचार्या डॉ. एस. आय. मडीवाळप्पागोळ, डॉ. डी. डी. कुलकर्णी, प्राध्यापक पी. बी. मिर्जी, एस. आर. बडिगेर, एन. एस. एस अधिकारी डॉ. डी. एस. कांबळे, प्रा. टी. एच. जिगरी, दुर्गवीर प्रतिष्ठानचे जयप्रकाश सावंत, महेश मिल्के, शंभर राष्ट्रीय स्वयंसेवक सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta