
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात बोलो रे बोलो महावीर बोलोच्या जयजयकारात महावीरांचा पालखी सोहळा गावातील प्रमुख मार्गे काढण्यात आला. अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे 24 वे तिर्थंकार वर्धमान महावीर जयंती निमित्त आज सकाळी बस्ती येथील मंदिरात महावीरांना पंचामृत अभिषेक करण्यात आला. तद्नंतर महावीरांचा पालखी सोहळा गावातील प्रमुख मार्गे काढण्यात आला. पालखी सोहळ्यात बोलो रे बोलो महावीर बोलो चा जयजयकार चाललेला दिसला. पालखी मिरवणुकीत गोमटेश जाबण्णावर, अण्णासाहेब पाटील, वसंत कोरडे, अण्णासाहेब पलसे, रोहण कोरडे, स्वप्नील पलसे, यश पलसे, देवदास माणगांवकर, प्रितेश मिर्जी, उत्तम पाटील, विजय सावगांवी, जैन समाजाच्या महिला समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखी मिरवणुकीची सांगता जैन बस्ती येथे करण्यात आली. तद्नंतर महावीरांचा जन्मकाळ साजरा करुन महाप्रसाद वाटप करण्यात आले. महाप्रसादाचा लाभ भक्तगणांनी घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta