
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील पार्श्वलब्दीपूरम येथील नूतन सांख्येश्वर पार्श्वनाथ मंदिरावर गुरुवार दि. २१ रोजी सकाळी ९.३० वाजता हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. पार्श्वलब्दी शासनसेवा ट्रस्टच्यावतीने आज भगवान श्री पार्श्वनाथ मंदिर ते पर्वतराव पेट्रोल पंप दरम्यान सवाद्यसमवेत शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये गजराज अश्व हे लोकांचे खास आकर्षण ठरले.

शोभायात्रेत आचार्य सांख्येश्वरप्रेमी श्री सेनसुरीश्वरजी महाराज पार्श्वलब्दी शासनसेवा ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य, तसेच श्रावक-श्रावकी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रेत श्रावक-श्रावकी नृत्यात रममाण दिसले. उद्या गुरुवार दि २१ एप्रिल २०२२ रोजी. भगवान श्री पार्श्वनाथ मंदीर उद्घाटन व प्रभू प्रतिष्ठापना कार्यक्रम होत आहे.. साखेश्वरप्रेमी श्री महासेनसुरीश्वरजी महाराज साहेब व श्री विक्रमसेन श्री सिद्धसेन श्री जिनसेन महाराज साहेब व पुण्यवर्धमान तपोनिधी साध्वी ऋचाप्रज्ञाजी याच्या नेत्रुत्वाखाली व मार्गदर्शनाखाली उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. भगवान श्री पार्श्वनाथांचे पाच कल्याण विधी अर्थात जन्मकल्यान केवलज्ञान कल्यान, निर्वाणकल्यान दिक्षाकल्याण विधी केले जाणार आहेत. उद्या गुरुवार दि. 21 ऐप्रील 2020 रोजी मुख्य प्रभुप्रतिष्ठापना कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आदी रज्यातून श्रावक, श्राविका मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे ट्रस्टचे महेश मेहता यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta