
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर नागरिक मंचतर्फे बाड ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष प्रकाश मैलाके यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. बाड ग्रामस्थांना शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे काम प्रकाश मैलाके करताहेत. डाॅ. जयप्रकाश करजगी यांच्या इस्पितळात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना डॉ. जयप्रकाश करजगी म्हणाले, बाड ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष प्रकाश मैलाके हे खरेखुरे समाजसेवक आहेत. ऐन उन्हाळ्यात त्यांनी स्वखर्चाने बाड ग्रामस्थांना घरोघरी जाऊन ट्रॅक्टर टॅंकरने शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे कार्य करीत आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी गोरगरिब कष्टकरी सर्वसामान्य लोकांना आहार किटचे वितरण करुन दिलासा मिळवून देण्याचे कार्य केले आहे. प्रकाश यांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना प्रकाश मैलाके म्हणाले आपण कर्तव्य भावनेतून बाड ग्रामस्थांना शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे काम हाती घेतले आहे. कोरोनाच्या काळात अडचणीत सापडलेल्या लोकांना आपण मदतीचा हात दिला आहे. सामाजिक कार्य करताना मनाला मिळणारे समाधान मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संकेश्वर नागरिक मंचचे डॉ. जयप्रकाश करजगी, पैलवान अप्पासाहेब कर्देण्णावर, पुष्पराज माने, सदा कब्बूरी, रमेश पुजारी, जयदेव रमाने कार्यकर्ते उपस्थित होते.-उपस्थितांचे स्वागत आणि आभार पुष्पराज माने यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta