Wednesday , July 22 2026
Breaking News

एन. डी. स्टुडिओच्या महाउत्सवासाठी बेळगावचे वाय. जी. बिरादार यांच्या चित्रांची निवड

Spread the love


बेळगाव : प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्ये दि. २८ एप्रिल ते १ मे दरम्यान महाउत्सवाचे आयोजन केले आहे. बेळगावचे चित्रकार आणि छाया चित्रकार वाय. जी. बिरादार यांच्या चित्रांची आणि छायाचित्रांची निवड करण्यात आली आहे. या महाउत्सवात महाराष्ट्रातील लोककला, विविध परिसंवाद, मान्यवर चित्रकार आणि छायाचित्रकार यांची चित्रे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. पन्नास हजारहून अधिक रसिक या महाउत्सवात सहभागी होणार आहेत. कला, क्रीडा आणि संस्कृती याचे दर्शन या महाउत्सवात घडणार आहे. या महाउत्सवात बेळगावचे चित्रकार आणि छाया चित्रकार वाय. जी. बिरादार यांच्या चित्रांची आणि छायाचित्रांची निवड करण्यात आली आहे. त्यांची निवडक छायाचित्रे महाउत्सवात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. बिरादार यांनी चित्रकला आणि छायाचित्र यामध्ये विविध अभिनव प्रयोग केले आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या चित्रांची आणि छायाचित्रांची प्रदर्शने झाली आहेत. अनेक पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

जीआयटी आणि क्रेडाई यांच्यात समन्वय करार

Spread the love  बेळगाव : बेळगावच्या गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि क्रेडाई बेळगाव यांच्यात विद्यार्थ्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *