
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात प्रथमच येथील रुक्मिणी गार्डनमध्ये येत्या रविवार दि. १ मे २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजता भव्य मराठा वधू-वर परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे आयोजन शुभकार्य वधुवर सुचक केंद्र, न्यायनिवाडा लोकनेता फौंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे. वधुवर महामेळाव्याला उपस्थित राहणाऱ्यांना मास्क बंधनकारक राहणार आहे. नो मास्क, नो प्रवेश असेच कांहीसे सुचित करण्यात आले आहे. महामेळावा उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संकेश्वर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, उद्योजक शिवाजीराव कळवीकट्टीकर, उपाध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, डॉ. मंदार हावळ, गंगाराम भूसगोळ, डॉ. शशिकांत कोरे, अभिजित कुरणकर, जयप्रकाश सावंत उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात प्रथम घटस्फोटीत, विधवा, विधुर, ज्येष्ठ तसेच विवाह इच्छूक मुला-मुलींचा परिचय करून दिला जाणार आहे. नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी शुभकार्य वधुवर सुचक केंद्राचे प्रमुख दादासाहेब खोत मोबाईल क्रमांक 09483285230, 8660454141 संपर्क साधावयाचा आहे.
Belgaum Varta Belgaum Varta